Maharashtra Election: 'तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज', PM मोदींनी केलं युवा आणि महिलांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन

PM Modi Tweet In Marathi: आज संपूर्ण देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठी भाषेमध्ये युवा आणि महिलांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
PM Modi Tweet
PM Modi TweetSaam Tv

प्रमोद जगताप साम टीव्ही, मुंबई

आज संपूर्ण देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान (Lok Sabha 2024) पार पडत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi Tweet) मराठी भाषेमध्ये युवा आणि महिलांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी युवा आणि महिलांना मतदानाचा नवा विक्रम निर्माण करण्याचं आवाहन केलंय. देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा उत्साह दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, आज मतदान (Voting) होत असलेल्या, मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते. विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज!, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं (PM Modi Tweet In Marathi) आहे.

महाराष्ट्रात ८ लोकसभा मतदार संघासाठी मतदान

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्यातील ८ लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान (aharashtra Election) होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यंत्रणा सज्ज आहे. राज्यातील बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, हिंगोली, यवतमाळ-वाशीम, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांत आज 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. आठ मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढाई होत आहे. नांदेड मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाची कसोटी पणाला लागली (PM Modi News) आहे. तर अकोल्यातून निवडणूक लढत असलेले वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे.

PM Modi Tweet
Voting Card: अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

१३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांसाठी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत (Lok Sabha Election) आहे. १३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांसाठी आज मतदान होणार आहे. केरळमधील सर्व जागांवर आज मतदान होत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी, अभिनेत्री हेमा मालिनी, शशी थरुर यांच्यासह अनेकांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे.

PM Modi Tweet
Amravati Election Voting LIVE: अमरावतील लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत; सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com