Maha Kumbh Stampede: महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू, ६० जखमी, घटनेमागचं कारणही सांगितलं

Maha Kumbh Stampede Update News : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला. तर ६० भाविक जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
mahakumbh stampede : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू (पीटीआय)
mahakumbh stampede : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू (पीटीआय) saam tv
Published On

Stampede in MahaKumbh Prayagraj : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ६० जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानाआधीच प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला. तर ६० भाविक जखमी झाले. मृतांपैकी २५ जणांची ओळख पटलेली आहे. जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची अधिकृत आकडेवारी घटनेनंतर जवळपास २० तासांनी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. डीआयजी वैभव कृष्ण यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यावेळी त्यांनी घटनेचं कारणही सांगितलं.

दुर्घटनेतील ३० मृतांपैकी २५ जणांची ओळख पटलेली आहे. तर जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ३६ जणांवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यासंबंधीचे आदेश दिले आहेत.

mahakumbh stampede : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू (पीटीआय)
Mahakumbh Mela Stampede Photo: कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतरची भयावह दृश्ये, मन हेलावून टाकणारे १० फोटो

अनेक कुटुंबांतील एकापेक्षा अधिक सदस्य या दुर्घटनेत मृत्युमुखी पावले आहेत. प्रचंड गर्दीच्या रेट्यामुळं बॅरिकेड्स तुटल्या. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात भाविकांचा मृत्यू झाला, असेही डीआयजी वैभव कृष्ण यांनी सांगितले.

आखाडा मार्गावर मध्यरात्री साधारण दीड वाजताच्या सुमारास प्रचंड गर्दी झाली होती. झुंसी परिसरात बॅरिकेड्स तुटले. संगमाच्या दिशेने निघालेल्या गर्दीत स्नानाच्या प्रतीक्षेत थांबलेले अनेक भाविक सापडले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

mahakumbh stampede : महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू (पीटीआय)
Maha Kumbh Mela Stampede: कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवरून संजय राऊत संपातले, म्हणाले- सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा?

पाठिमागून प्रचंड गर्दीचा रेटा आला अन्...

महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर जवळपास २० तासांनी प्रशासनानं मृतांची अधिकृत संख्या प्रशासनानं जाहीर केली. त्याचवेळी चेंगराचेंगरीचं कारणही सांगितलं. महाकुंभ डीआयजी वैभव कृष्ण यांनी ही घटना कशी घडली याची माहिती दिली. भाविक ब्रह्म मुहूर्ताच्या प्रतीक्षेत होते. त्याचवेळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले. पाठिमागून गर्दीचा रेटा वाढल्याने अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. २९ तारखेला कोणतीही व्हीव्हीआयपी मुव्हमेंट नव्हती. यापुढील स्नानपर्वासाठीही कोणतीही व्हीव्हीआयपी मुव्हमेंट नसेल, असेही वैभव कृष्ण यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com