
मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील एका गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका किरकोळ वादातून अपंग व्यक्तीला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. अर्धनग्न करून त्यांना भल्या मोठ्या काठीने मारहाण केली असून, याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पीडित व्यक्ती विकलांग दुकानदार असून, मारहाण करण्यामागचं कारण अस्पष्ट आहे.
सोशल मीडियावर वादाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी हाणामारीचे तर, कधी भांडणाचे. वादाला किती भंयकर रूप द्यायचं हे आपल्या हातात असतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका अपंग व्यक्तीला अमानुष मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी जुझार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
एफपीजीच्या वृत्तानुसार, पीडित अपंग व्यक्ती दुकानदार असल्याची माहिती आहे. त्यांचं गावात एक छोटंसं दुकान आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, पीडित व्यक्ती अर्धनग्न अवस्थेत दिसून येत आहे. त्याच्याजवळ दोन - तीन स्थानिक पुरूष येतात, त्यांच्या हातात काठी देखील दिसत आहे. दोन्ही स्थानिक पुरूष विकलांग व्यक्तीवर क्रूरपणे हल्ला करत आहेत. भल्या मोठ्या काठीने त्यांच्यावर वार होत आहे.
जीवाच्या आकांताने वृद्ध व्यक्ती मदतीसाठी हाक देत आहे. मात्र, त्या हाकेला कुणी ओ सुद्धा दिलेला नाही. हल्लेखोरांनी रागाच्या भरात क्रूरपणे मारहाण केल्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. वृद्धाला काळं निळं होईपर्यंत मारल्यामुळे त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली. मात्र, त्यांच्यावर इतकी क्रूरपद्धतीने मारहाण का करण्यात आली, हे अद्याप अस्पष्ट आहे. हा व्हिडीओ @FreePressMP या X हँडलवरून शेअर करण्यात आला असून, अनेक नेटिझन्सनी या अमानुष घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.