पोलीस दलात पुन्हा मोठा फेरबदल; 5 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?

Madhya Pradesh Police Reshuffle 8 Officers Transfer List: मध्य प्रदेश पोलीस दलात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. 5 IPS आणि 3 MPS अधिकाऱ्यांसह 8 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Madhya Pradesh police reshuffle 8 officers transfer list
Madhya Pradesh police reshuffle 8 officers transfer listsaam tv
Published On: 

मध्य प्रदेशच्या प्रशासकीय आणि पोलीस विभागात पुन्हा एकदा मोठे खांदेपालट करण्यात आले आहे. राज्य सरकारने प्रशासन अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने 8 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या फेरबदलात पोलीस दलातील (IPS) तसेच मध्य प्रदेश पोलीस सेवेतील (MPS) अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

Madhya Pradesh police reshuffle 8 officers transfer list
IPS Officer: ३५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; युपी पोलीस दलात मोठा फेरबदल

विक्रम अहिरवार यांची भोपाल शहराच्या डीसीपीपदी नियुक्ती

या बदल्यांमध्ये विक्रम अहिरवार (IPS) यांची नियुक्ती विशेष चर्चेत आहे. ते यापूर्वी उज्जैनमधील नागदा येथे सीएसपी पदावर कार्यरत होते. आता त्यांची पदोन्नती करून भोपाल शहरात अतिरिक्त डीसीपी, झोन-3 म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भोपाल हे शहर मध्य प्रदेशची राजधानी असून व्हीआयपी परिसरासह मोठी लोकसंख्या असलेले शहर आहे. त्यामुळे विक्रम अहिरवार यांच्यावर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.

Madhya Pradesh police reshuffle 8 officers transfer list
IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

कोणत्या अधिकाऱ्याला कुठली जबाबदारी?

आदित्य सिंघारिया (IPS) - सिहोरा, जबलपूर येथील एसडीओपी पदावरून पदोन्नती. आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हा खंडवा.

मनस्वी शर्मा (IPS) - त्योथर, रीवा येथील एसडीओपी पदावरून पदोन्नती. आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हा उज्जैन.

मनीष भारद्वाज (IPS) - इंदूर कोतवाली परिसरातील एसीपी पदावरून बदली. आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हा जबलपूर.

जेंडेन लिंगजोरपा (IPS) - महिदपूर, उज्जैन येथील एसडीओपी पदावरून बदली. आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हा ग्वाल्हेर.

घनश्याम मालवीय (MPS) - एएसपी शाजापूर पदावरून पदोन्नती. आता पोलीस मुख्यालय (PHQ), भोपाळ येथे सहायक महानिरीक्षक (AIG).

महेंद्र तराणेकर (MPS) - एएसपी खंडवा पदावरून बदली. आता एएसपी, शाजापूर.

शालिनी दीक्षित (MPS) - अतिरिक्त डीसीपी, झोन-3, भोपाल सिटी पदावरून बदली. आता एआयजी (AIG), पोलीस मुख्यालय, भोपाल.

Madhya Pradesh police reshuffle 8 officers transfer list
सुट्टीच्या दिवशी पोलीस दलात मोठा भूकंप! 7 IPS, 39 अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ

या फेरबदलामुळे मध्य प्रदेशातील पोलीस प्रशासनात महत्त्वाचे बदल झाले आहेत. प्रमुख जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यात आल्याने कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यावर सरकारचा भर असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com