२० वर्षे एकत्र कंपनीत काम केलं, अचानक ट्रान्सफर केली; ७ कर्मचाऱ्यांनी उचललं धक्कादायक पाऊल

कंपनी मालकानं अचानक बदली केल्यानं नैराश्यात आलेल्या सात कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी धक्कादायक पाऊल उचललं. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ही घटना घडली.
Madhya Pradesh News
Madhya Pradesh News SAAM TV
Published On

Madhya Pradesh News Update | इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ही गंभीर बाब असतानाच, जिल्ह्यातील परदेशीपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कंपनीत काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हे सातही जण २० वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत होते. कंपनीची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. त्यामुळे कंपनीच्या संचालकांनी या सात कर्मचाऱ्यांची बदली दुसऱ्या कंपनीत केली. त्यामुळे सातही जण नैराश्यात गेले. परदेशीपुरा पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील या कपनीत हे सातही कर्मचारी गेले. त्यांनी गोंधळ घातला. आम्ही विष प्यायलो आहोत, अशी माहिती त्यांनी कंपनीच्या संचालकांना दिली.

Madhya Pradesh News
भयंकर! 25 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीपात्रात बुडाली; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

आम्ही जिवाचं बरंवाईट करणार आहोत, असं या कर्मचाऱ्यांनी (Employee) संचालकांना सांगितलं. याबाबतची माहिती कंपनीच्या संचालकांना मिळाली. त्यांनी याबाबत तातडीने परदेशीपुरा पोलीस ठाण्याला कळवले. घटनेची माहिती मिळताच परदेशीपुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातही कर्मचाऱ्यांना तातडीने उपचारासाठी एमवाय हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे उपचार केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Madhya Pradesh News
बैलगाडीवर अचानक तुटून पडली विद्युत तार; शेतकऱ्यासह एका बैलाचा मृत्‍यू

कंपनीचे कर्मचारी अनिल यांनी सांगितले की, ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, ते जवळपास १५ ते २० वर्षांपासून येथे काम करत आहेत. कंपनीच्या संचालकांनी सांवेर रोडस्थित दुसऱ्या कंपनीत त्यांची बदली केली. ती कंपनी दूर आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत होते.

या प्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कंपनीची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. सात-आठ वर्षांपासून कंपनी तोट्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीला कोणतंच काम मिळत नाही. त्यामुळे कंपनीच्या मालकाने कंपनीतील या कर्मचाऱ्यांची बदली सांवेर रोड स्थित दुसऱ्या कंपनीत केली होती. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी प्रकृती आता स्थिर आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com