अब्जाधीश उद्योगपती एलन मस्कच्या फ्लाईंग कार टेस्लाला आता थेट एका भारतीयानं आव्हान दिलयं ते तशीच उडती कार बनवून..कुठलीही पदवी नसताना तंत्रज्ञानाचा हा नवा आविष्कार केलाय. उत्तराखंडच्या रवी टमटा यांनी...हॅपिडा स्कायनेक्स नावाची फ्लाईंग कार बनवलीये. . ही एक सीटर फ्लाइंग कार पूर्णपणे विजेवर चालते आणि या कारची यशस्वी चाचणी पार पडलीय
BA पदवीधर असलेल्या रवी यांनीे केवळ इंटरनेट आणि पुस्तकांच्या मदतीने 13 वर्ष कठोर परिश्रम आणि संशोधन करून ही कार तयार केलीय. याआधी इलेक्ट्रोलाइट पंप मशीन, मोबाईल चार्जिंग शूज, हेलिकॉप्टरचे प्रोटोटाइप आणि जीपीएस स्टिक तसंच वन विभागासाठी अग्निशामक यंत्रे यांसारखे नाविन्यपूर्ण शोध लावले आहेत...रवीनं तयार केलेल्या फ्लाईंग कारचं वैशिष्टय काय? पाहूयात...
'हपिडा स्कायनेक्स'ची वैशिष्ट्ये काय?
'हपिडा स्कायनेक्स' ही उडणारी कार पूर्णपणे बॅटरीवर चालते.
एका माणसाला सुरक्षितपणे हवेत वाहून नेता यावे, यासाठी कारच्या तंत्रज्ञानात अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत.
सध्या ही फ्लाईंग कार डोंगराळ भागातल्या प्रवासासाठी आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांसाठी तयार करण्यात आलीये. अद्याप, या फ्लाईंग कारला सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे आता ही मेड इन इंडिया फ्लाईंग कार टेस्लाच्या आधीच बाजारात एन्ट्री मारणार का, याचीच सर्वांना उत्सुकता लागलीये...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.