Raghuvanshi: कातिल दुल्हन! राजा रघुवंशी प्रकरणात वेगळा ट्विस्ट; थरारक हत्याकांडाची वाचा A टू Z स्टोरी

Raja raghuvanshi case: राजा रघुवंशी हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. नऊ दिवसांपूर्वी लग्न झालेलं जोडपं हनिमूनसाठी मेघालयला गेलं आणि तिथून घडलेल्या या क्रूर घटनेने साऱ्यांनाच धक्का बसला.
Raghuvanshi
RaghuvanshiSaam
Published On

राजा रघुवंशी हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. नऊ दिवसांपूर्वी लग्न झालेलं जोडपं हनिमूनसाठी मेघालयला गेलं आणि तिथून घडलेल्या या क्रूर घटनेने साऱ्यांनाच धक्का बसला. या प्रकरणी आता पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर येत आहे. राजाचा मृतदेह शिलाँग येथे सापडला. त्यानंतर पोलीस तपासात संशयाची सुई सोनमकडे वळली. १७ दिवसांपासून फरार असलेल्या सोनमनं अखेर उत्तरप्रदेशच्या गाझीपूरमधील नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. या हत्याकांडाचा नेमका घटनाक्रम कसा होता? जाणून घेऊयात थोडक्यात...

- राजा रघुवंशी आणि सोनमचं ११ मे रोजी लग्न झालं होतं. लग्नाच्या ९ दिवसांनी म्हणजेच २० मे रोजी नवविवाहित जोडपे त्यांच्या हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले.

- सोनमने प्रेमासाठी प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढण्याचा प्लान आखला. २३ मे रोजी शिलाँगमधील नोंग्रियाट गावातील डबल डेकर लिविंग रूट ब्रिज बघितल्यानंतर दोघेही बेपत्ता झाले. २४ मे रोजी सोहराजवळ त्यांची भाड्याने घेतलेली स्कूटी बेवारस अवस्थेत आढळली.

- २ जून रोजी राजाचा मृतदेह वैसावाडोंग धबधब्याजवळील एका खड्ड्यात सापडला. त्याच्या हातावर राजा नावाचं टॅटू होतं. त्या टॅटूवरून त्याची ओळख पटली. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून राजाची हत्या झाल्याचं उघड झालं.

Raghuvanshi
OYO Crime: दुरावा वाढला, कपल OYO हॉटेलमध्ये गेले; प्रियकराच्या डोक्यात सैतान घुसला, बंद दाराआड..

- राजाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी सोनमचा शोध घेण्यास सुरूवात केली. सुरूवातीला सोनमचं अपरहण झालं, त्यानंतर तिला देखील कुणी काही तरी केलं की काय असं अनेक तर्क लावण्यात आले. त्या अँगलने पोलिस तपास सुरू होता.

- हनिमूनदरम्यान सोनम तिचा प्रियकर राज कुशवाह याच्या संपर्कात होती. सोनम आणि राज या दोघांनीच राजाच्या हत्येचा कट रचला. त्यांनी राजाच्या हत्येसाठी तिघांना सुपारी दिली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या तिघांनी राजची निर्घृण हत्या केली.

- नवऱ्याच्या हत्येनंतर तब्बल १७ दिवस सोनम फरार होती. सोनमने उत्तरप्रदेशातील गाजीपूरमधील नंदगंज पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं. तसेच तिने गुन्ह्याची कबुली दिली.

Raghuvanshi
Mumbai Local: १,२,३,४,५,६... मुंब्रा स्थानकावर मृतदेहाचा खच, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप

- दरम्यान, इंदूर आणि मेघालय पोलिसांच्या पथकांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आधी ३ आरोपींना इंदूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. नंतर चौथ्या आरोपीला पोलिसांनी सागर जिल्ह्यातील बीना तहसीलमधील बसहरी गावातून अटक केली.

दरम्यान, राजा रघुवंशीच्या हत्येमागे प्रेमसंबंध आणि कटकारस्थान असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांनी मिळून मेघालयात राजा रघुवंशीची हत्या केली. या घटनेचा तपास सुरू असून, सोनमने पोलिसांसमोर केलेल्या आत्मसमर्पणानंतर तिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. राजाच्या आईने सोनमला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे सोनमच्या वडिलांनी आपली मुलगी निर्दोष असल्याचे सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com