Narendra Modi: २ टर्ममध्ये ज्या वेगाने देशाची प्रगती झाली, त्याच वेगाने विकासाची कामे होणार: मोदी

Narendra Modi Meet President Droupadi Murmu: राष्ट्रपतींना खासदारांचं समर्थन पत्र दिलं यानंतर राष्ट्रपतींनी NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केलं. यावेळी मोदींनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला.
Narendra Modi: २ टर्ममध्ये ज्या वेगाने देशाची प्रगती झाली, त्याच वेगाने विकासाची कामे होणार: मोदी
Narendra Modi Meet President Droupadi Murmu

नवी दिल्ली: एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सरकार स्थापन करण्याचा दावा केला. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना खासदारांचं समर्थन पत्र दिलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी देशवाशियांना विकास कार्याची हमी दिली.

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींना खासदारांचं समर्थन पत्र दिलं यानंतर राष्ट्रपतींनी NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. 9 जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 'मी देशवासियांना आश्वासन देतो, गेल्या दोन टर्ममध्ये देशाने ज्या गतीने प्रगती केली, त्यापेक्षा अधिक वेगाने विकास कामे केली जातील, असं राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले.

देशाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार काम करेल, असेही मोदी यावेळी म्हणाले. देशाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कमी पडू देणार नसल्याचं अश्वासन मोदींनी दिलं. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, राष्ट्रपती मुर्मू यांनी आम्हाला सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं. तसेच मंत्रिमंडळातील जे मंत्र्यांची शपथ विधी करून घ्यायची आहे, त्यांच्या नावांचा यादी सुद्धा राष्ट्रपतींनी मागितली असल्याचं मोदी म्हणाले. रविवारी संध्याकाळी शपथविधीचा कार्यक्रम होईल. राष्ट्रपती भवन उर्वरित तपशील तयार करेल. तोपर्यंत आम्ही मंत्रिमंडळाची यादी राष्ट्रपतींना सादर करू. त्यानंतर शपथविधी होईल अशी माहिती नरेंद्र मोदींनी पत्रकारांना दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com