Lok Sabha Election 2024: एक्झिट पोल पुन्हा फेल! NDA चा ४००पारचा दावा ठरला फोल

Lok Sabha Election 2024: यंदाची लोकसभा निवडणूक विविध मुद्द्यांमुळे चर्चेत आली होती. लोकसभा २०२४ मध्ये भाजपने ४०० चा नारा दिला होता. भाजपच्या ४०० पार घोषणेमुळे विरोधकांचे धाबे दणाणले होते. परंतु लोकसभेचे निकाल पाहता भाजपच्या घोषणेमुळेच भाजपचा पराभव झाल्याच सांगितलं जात आहे.
Lok Sabha Election 2024: एक्झिट पोल पुन्हा फेल! NDA चा ४००पारचा दावा ठरला फोल
Lok Sabha Election 2024TOI

लोकसभा निवणुकीचे निकाल हाती येत असून भाजपचा ४०० पारचा दावा फोल ठरलाय. एक्झिट पोलनुसार एनडीएच्या विजयाचा दावा करण्यात येत होता. मात्र निकाल येताच ४०० पारच्या दाव्याची हवा निघालीय. निवडणुकीचे निकाल आज समोर येत असून सुरुवाती निकालानुसार, एनडीएला हवा तसा विजय मिळताना दिसत नाहीये.

एनडीएने निवडणुकीच्या प्रचारात ४०० पारचा नारा दिला होता. मात्र हाच नारा त्यांच्या अंगलट आल्याचं राजकीय विश्लेषकांनी म्हटलंय. आतापर्यत हाती आलेल्या आकड्यानुसार, एनडीए २९८ आणि इंडिया आघाडी २२६ जागांवर आघाडीवर आहे. या आकड्यावरुन भाजप विजयाची हॅट्रिक करू साधू शकणार नसल्याचं शक्यता आहे.

एक्झिट पोल ठरले फोल

दोन दिवसापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले होते. या आकडेवारीनुसार एनडीएचा मोठा विजय होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आज जाहीर झालेल्या निकालात भाजपची गच्छंती झालीय. पोलच्या अंदाजानुसार, एनडीएला ३६५ आणि इंडिया आघाडीला १४५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात होता.

अनेक राज्यात खेळ झाला खराब

एक्झिट पोलनुसार, मोदी सरकार सत्तेची हॅट्रिक साधणार असं म्हटलं जात होतं. परंतु मिळालेल्या जागांवरुन तिसऱ्यांदा सरकार स्थापन होणं दुरापास्त शक्य नाही. भाजपचं सरकार बनेल, असं १३ एक्झिट पोलमध्ये जाहीर करण्यात आले होते. तर काही पोलनुसार, २०१९ मध्ये ३०३ जागा मिळाल्या होत्या, त्याप्रमाणे यंदाही तितक्याच जागा मिळतील असं सांगितलं जात होतं. एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आणि दिल्लीमध्ये भाजपला एकतर्फा विजय मिळेल असा अंदाज वर्तवला होता. परंतु सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशात बसलाय. येथे एनडीएला फक्त ३२ ते ३७ आणि इंडिया आघाडीला ४२ जागा मिळाल्यात .

का फेल गेला ४०० पारचा नारा

राजकीय जाणकारांच्या मते, ४०० पारचा नारा देणं भाजपच्या अंगाशी आले आहे. या घोषणेमुळे भाजपचे कार्यकर्ते अति आत्मविश्वासात आले. मतदार मतदान करायला आले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी कोणत्याच प्रकारचे प्रयत्न केले नाहीत. भाजपने उत्तर प्रदेशातील अनेक नेत्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. परंतु स्थानिकांच्या मते, हे उमेदवार खासदार असताना कधीच मतदारसंघात फिरले नाहीत, अशी तक्रार अनेकांनी महेंद्रनाथ पांडेय, मेनका गांधी यांच्याकडे केली होती. तरीही त्यांना उमेदवारी दिल्याने मतदार नाराज होते.

Lok Sabha Election 2024: एक्झिट पोल पुन्हा फेल! NDA चा ४००पारचा दावा ठरला फोल
Narendra Modi Varanasi : वाराणसीत 'फिर एक बार' मोदी खासदार; तरीही काँग्रेसच्या उमेदवाराने मिळवली इतकी मते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com