Congress Candidate List Announced
Congress Candidate List AnnouncedSaam Tv

Lok Sabha Election 2024: काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक

Congress Lok Sabha Election 2024 Candidate List: काही दिवसांत देशात लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली जाऊ शकते. त्याआधी राजकीय पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. दरम्यान, काँग्रेसने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
Published on

Congress Announced First List For Lok Sabha Election 2024 :

लोकसभा निवडणुकीच मैदान तयार झाले असून या रिंगणात उतरण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या रणांगणात कोणते उमेदवार उतरणार आहेत त्यांची नावे जाहीर केली आहेत. भाजपनंतर काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहेत. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ३९ उमेदवांची नावे जाहीर केली. (Latest News)

दरम्यान, काँग्रेसने एकूण ८ राज्यांमधील उमेदवारांची यादी जाहीर केली. यात केरळमधील १५, छत्तीसगड आणि कर्नाटकमधील प्रत्येकी ६ नावे, तेलंगणातील ४ मेघालयातील २ आणि त्रिपुरा, सिक्कीम आणि नागालँडमधील प्रत्येकी एका उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसने सामान्य वर्गातील १५ जणांना निवडणुकीत उतरवलंय. २४ उमेदवार एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील आहेत. तर १२ उमेदवार ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तर ८ उमेदवार ५०-६० वयोगटातील आहेत. १२ लोक ६१-७० वयोगटातील आहेत. तर ७ उमेदवार हे ७१-७६ वयातील आहेत.

Congress Candidate List Announced
Mumbai News: ब्रेकिंग! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले; वर्षा गायकवाड यांच्यासह ६०-७० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

काँग्रेसने दक्षिणेतील आपल्या सर्व विद्यमान खासदारांना तिकीट दिले आहे. त्यावरून काँग्रेसने दक्षिण भागावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. काँग्रेसला दक्षिणेतील बालेकिल्ल्यावरील पकड कायम ठेवायची असल्याचं दिसत आहे. उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतात काँग्रेस आधीच खूप मजबूत आहे. राहुल गांधी यावेळी एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राहुल गांंधी वायनाड येथूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांना तिरुअनंतपुरम या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय.  

दरम्यान काँग्रेसने पहिल्यांदाच भूपेश बघेल यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवलंय. त्यांना छत्तीसगडच्या राजनंदगाव या मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांचेही नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com