LIC Faces Controversy: अदानीच्या कल्याणाची जबाबदारी LICकडे? LIC चे 33 हजार कोटी अदानीला

LIC Alleged Investment In Adani Group: आता बातमी आहे देशाला हादरवणारी...कारण देशातील नागरिकांचं भविष्य सुरक्षित करणाऱ्या LIC ने आता सर्वसामान्यांच्या कल्याणाऐवजी अदानींच्या कल्याणाची जबाबदारी घेणार आहे... असा दावा करण्यात आलाय.. मात्र हा दावा कुणी केलाय? आणि त्यावरुन कसं वातावरण तापलंय?
LIC Logo alongside Adani Group offices  Washington Post claims spark nationwide controversy in India.
LIC Logo alongside Adani Group offices Washington Post claims spark nationwide controversy in India.Saam Tv
Published On

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी म्हणत देशभरातील जनतेच्या भविष्याची जबाबदारी असलेली LIC इंडिया आता अदानी समुहात 33 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचा मोठा दावाच अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टनं केलाय...

वॉशिंग्टन पोस्टचा दावा

कर्ज वाढल्यानं अमेरिका, युरोपियन बँकांचा अदानींना कर्जास नकार

अमेरिकेतील आरोपांनंतर अदानींना 3.9 अब्ज डॉलर मदतीची भारताची योजना

भारतीय अधिकाऱ्यांची LIC कडून अदानींना मदत करण्याची योजना

मे महिन्यात DFS, LICची 3.9 अब्ज डॉलरची गुंतवणूक योजना मंजूर

अदानी समुहात गुंतवणुकीस इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी ही रणनीती

वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्यानंतर आता काँग्रेस चांगलीच आक्रमक झालीय..काँग्रेसनं थेट संयुक्त संसदीय समितीची मागणी केलीय... एवढंच नाही तर एलआयसीचे 33 हजार कोटी अदानी समुहात गुंतवणं म्हणजे मोदींनी भारतीयांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपच काँग्रेसनं केलाय..या वृत्तानंतर गदारोळ माजल्यानंतर LIC नं स्पष्टीकरण देत वॉशिंग्टन पोस्टचा दावा फेटाळून लावलाय..

LICची गुंतवणूक पूर्ण खबरदारी घेऊन सुरक्षितपणे केली जाते

वाशिंग्टन पोस्ट वृत्तानुसार अदानी समुहात कोणतीही गुंतवणूक नाही

वृत्तातील दस्तऐवजांनुसार कोणतीही योजना LICनं तयार केलेली नाही

LICची स्वच्छ प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूनं हा रिपोर्ट प्रसारित

भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेला नुकसान पोहचवण्यासाठीच हे वृत्त

खरंतर अदानी समुहावर झालेला हा आरोप पहिल्यांदाच झाला नाही... तर याआधीही हिंडेनबर्ग संस्थेनं अदानी समुहावर शेल कंपन्यांमार्फत हेराफेरी केल्याचा गंभीर आरोप केला होता.. त्यावेळीही काँग्रेसने मोदी सरकारला खिंडीत गाठलं होतं.. तर अमेरिकेत कंत्राट मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना 2100 कोटींची लाच दिल्याप्रकरणी अमेरिकन कोर्टानं अदानींना दोषी ठरवलं होतं... आता पुन्हा एकदा वॉशिंग्टन पोस्टनं एलआयसी अदानी समुहात गुंतवणूक करणार असल्याचा दावा केलाय

“जिंदगी के साथ भी... जिंदगी के बाद भी...” ही एलआयसीची टॅगलाईन कोट्यवधी भारतीयांच्या विश्वासाचं प्रतिक आहे.. त्यामुळे कर्जात बुडालेल्या अदानी समुहाला बाहेर काढण्यासाठी आता LIC 33 हजार कोटींची गुंतवणूक करुन भारतीयांच्या विश्वासाला तडा देणार की विश्वासाचा वारसा जपणार ? याकडे देशाचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com