Lateef Bhatt : बाप शेतकरी, इंग्लिश मीडियममधून शिक्षण, सुतारकामातून ₹ १३००० कमावणारा लतीफ कसा झाला दहशतवादी?

Kashmir Lateef Bhatt News : काश्मीरमधील लतीफ भट याची कहाणी थक्क करणारी आहे. सुतारकाम करून कुटुंबाला हातभार लावणारा लतीफ दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. जाणून घ्या लतीफच्या आयुष्यातील संपूर्ण घटनाक्रम.
Latif Bhat's Journey
Latif Bhat's JourneyAI Image
Published On: 

आपल्या आयुष्यात घेतलेला प्रत्येक छोटा मोठा निर्णय जर चुकीचा निघाला तर किती मोठं नुकसान होऊ शकत याचा प्रत्यय काश्मीर येथे घडलेल्या एका घटनेतून येतो. घटना आहे काश्मीर मधल्या लतीफची. त्याचं बालपण सर्वसामान्य कुटुंबात गेलं. लतिफचे वडील शेती काम करून कुटुंबाचा उदर्निवाह करत होते. त्याने आठवीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलं. त्यानंतर बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्याने कुलगाममधील एका मशीन युनिटमध्ये सुतारकाम सुरू केलं. काचांच्या खिडक्या बसवण्याचं कामही तो करायचा. या कामातून त्याला महिन्याला साधारण १३ ते १५ हजार रुपये मिळत होते.

सुतार कामातून मिळणाऱ्या पैशातून लतीफने कुटुंबाला हातभार लावला. सगळं सुरळीत सुरु असताना लतीफच पाऊल चुकीच्या वळणावर पडलं. लतिफ दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला आणि त्याच्या आयुष्यातील हा चुकीचा निर्णय ठरला. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी लतीफ तापाने फणफणला आणि इतर दिवसांच्या तुलनेत तो त्यादिवशी लवकर झोपला. दुसऱ्यादिवशी सकाळी सूर्य डोक्यावर यायच्या आधी उठून स्वतःच सगळं आवरून तो जवळच्या मशिदीत नमाज पढण्यासाठी गेला.

Latif Bhat's Journey
Breaking News : मोठी बातमी! भाजपकडून शिंदेसेनेला मोठा झटका, बड्या नेत्याने हाती घेतलं 'कमळ'

नमाज पढण्यासाठी गेलेला लतीफ सूर्यास्त झाला तरी घरी आलाच नाही. मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आई वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला. पोटचा मुलगा घरीच आला नाही या काळजीपोटी वडिलांनी शोधाशोध केली. परंतु लतिफचा काही ठावठिकाणा लागला नाही. शेवटी वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सुरुवातीला कुटुंबीयांना वाटलं की तो कुठेतरी गेला असेल, तो परत येईल या आशेवर त्याचे आई वडील होते. मात्र, वर्ष झालं तरी लतिफ काही घरी परतला नाही. वर्षभरानंतर त्याच तरुणाची ओळख लष्कर-ए-तोयबाचा कमांडर म्हणून समोर आली. लतिफला त्या भागातील टॉप कमांडर बनायचं होत.

Latif Bhat's Journey
Breaking News : मोठी बातमी! भरदिवसा काँग्रेस नेत्याच्या कारवर 7 गोळ्या झाडल्या; राजकीय वर्तुळात खळबळ

काही दिवसांनी सोशल मीडियावर लतीफचा फोटो वेगाने व्हायरल झाला. या फोटोखाली त्याने लष्कर-ए-तोयबाशी संबंधित काश्मीर रिव्होल्यूशन आर्मी या संघटनेत प्रवेश केल्याचा दावा केला. पण तो तिथपर्यंत कसा पोहोचला याबाबत कोणाला काही कल्पना नव्हती. मात्र या सगळ्यावर त्याच्या आईवडिलांचा काही विश्वास बसेना. दरम्यान,पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला होता. असं असतानाच सीआरपीएफच्या तपासणी नाक्यावर झालेल्या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. या हल्ल्यात लतीफचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला घेरण्यासाठी शोधमोहीम तीव्र केली.

Latif Bhat's Journey
Gold Rate Today : ग्राहकांसाठी खुशखबर! सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; सुवर्णनगरीत १ तोळ्याची किंमत किती?

या शोधमोहिमेनंतर लतीफला शरण येण्यासाठी सांगितले, मात्र लतीफने ही संधी धुडकावली. अखेर कुलगाममध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत लतीफ भट चा खात्मा झाला. दुसरीकडे त्याच्या मृत्यूची बातमी कळताच आई वडिलांच्या काळजाचा ठोका चुकला. एका सामान्य घरात जन्माला आलेल्या या लतिफाच्या एका चुकीच्या निर्णयाने त्याच्या आयुष्याचा शेवट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.