Petrol Diesel Price 27th July: कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे नवीन दर

Petrol Diesel Price Today 27th july 2023: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
Petrol Diesel Price 27th July
Petrol Diesel Price 27th Julysaam Tv
Published On: 

Petrol Diesel Price News in Marathi:

आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत 83 डॉलरच्या वर गेली आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. आज अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत, तर काही ठिकाणी दर घसरले आहेत

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, नोएडामध्ये पेट्रोल 35 पैशांनी घसरून 96.65 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 32 पैशांनी स्वस्त होऊन 89.82 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गुरुग्राममध्ये पेट्रोल 29 पैशांनी महाग झाले असून ते 97.00 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. येथे डिझेल 29 पैशांनी महागले असून ते 89.88 रुपये प्रति लिटर झाले आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल 16 पैशांनी घसरून 108.45 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 14 पैशांनी घसरून 93.69 रुपये प्रति लिटरवर पोहोचले.

Petrol Diesel Price 27th July
Palghar Trip Place : मुंबई, ठाण्याजवळ ट्रिप प्लान करताय? पालघरमधील ही ठिकाणं घालतील भुरळ

कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासात त्याच्या किमतीत आणखी वाढ होणार आहे असे सांगण्यात येत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 83.44 पर्यंत वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआयचा दरही प्रति बॅरल $79.40 वर पोहोचला आहे.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर

  • मुंबईत (Mumbai) पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये

  • चेन्नईत  पेट्रोल (Petrol) १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.

  • कोलकाता येथे पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल (Diesel) 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Price 27th July
Gold Silver Rate (26 July): सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीचे भावही वधारले; जाणून घ्या मुंबईतील आजचे दर

2. घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.