Petrol Diesel Latest Price
Petrol Diesel Latest PriceSaam TV

Petrol Diesel Price 26 July: कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Petrol Diesel Price Today 26 july 2023: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडीशी घसरण होताना दिसत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 79.35 डॉलरवर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 83.33 डॉलरवर व्यवहार करत आहे.
Published on

Petrol Diesel Price in Marathi: आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत थोडीशी घसरण होताना दिसत आहे. डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 79.35 डॉलरवर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 83.33 डॉलरवर व्यवहार करत आहे. त्यातच आता बुधवारी सकाळी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात.  (Latest Marathi News)

Petrol Diesel Latest Price
Nanded News: अंगात मस्ती येऊ देऊ नका, एका मिनिटात उतरवू; शिंदे गटाच्या खासदाराची तहसीलदारांना धमकी, VIDEO व्हायरल

उत्तर प्रदेशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेल 53 पैशांनी महागले आहे. हरियाणात पेट्रोल 42 पैशांनी तर डिझेल 41 पैशांनी महागले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या (Deisel) दरात वाढ झाली आहे. त्याचवेळी राजस्थानमध्ये पेट्रोल 55 पैशांनी आणि डिझेल 50 पैशांनी स्वस्त झाले आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित घट झाली आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 942 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol Diesel Latest Price
Solapur News: शरद पवारांना मोठा धक्का! बड्या नेत्याच्या मुलाचा अजितदादांच्या गटात प्रवेश

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com