Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले? वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today 11 May 2023: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम गुरुवारी सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमतींवरही दिसून येत आहे.
Petrol Price Today, Diesel Price Today, Fuel Rate Today
Petrol Price Today, Diesel Price Today, Fuel Rate Today Saam Tv

Petrol Diesel Rates: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम गुरुवारी सकाळी जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमतींवरही दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये अनेक ठिकाणी बदल दिसून येत आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. (Latest Marathi News)

Petrol Price Today, Diesel Price Today, Fuel Rate Today
MLA With Uddhav Thackeray: अख्खा पक्ष फुटला, पण या 16 आमदारांनी नाही सोडली उद्धव ठाकरेंची साथ

गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) मध्ये पेट्रोल (Petrol) 15 पैशांनी वाढून 96.79 रुपये प्रति लिटर झाले आहे. येथे डिझेलही 14 पैशांनी महागले असून ते 89.96 रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय गाझियाबादमध्ये पेट्रोल 32 पैशांनी स्वस्त झाले असून ते 96.26 रुपयांवर पोहोचले आहे. येथे डिझेल (Diesel) 30 पैशांनी घसरून 89.96 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये 14 पैशांनी घसरल्यानंतर पेट्रोल 96.33 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. येथे डिझेलचे दरही 13 पैशांनी घसरले असून 89.53 रुपये प्रति लिटरने विकली जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Petrol Price Today, Diesel Price Today, Fuel Rate Today
Jalna Crime News: नात्याला काळिमा! मुलानेच केला आईवर बलात्कार; जालन्यातील मन सुन्न करणारी घटना

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com