MLA With Uddhav Thackeray: अख्खा पक्ष फुटला, पण या 16 आमदारांनी नाही सोडली उद्धव ठाकरेंची साथ

Maharashtra Political Crisis: पक्षात ऐतिहासिक बंडखोरी झाली, बंडखोर आमदारांनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. एवढं असतानाही 16 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही
MLA With Uddhav Thackeray
MLA With Uddhav Thackeraysaam tv

These MLAs did not leave Uddhav Thackeray's support even big split: शिवसेनेत 9 महिन्यांपूर्वी ऐतिहासिक बंडखोरी झाली. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात पक्षातील 40 आमदारांनी बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. दोन्ही गटात सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगासमोर जोरदार संघर्ष झाला. या संघर्षात निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांचा पक्ष खरी शिवसेना असल्याचा निकाल देत पक्षाचं नाव आणि धनुष्यबान चिन्ह त्यांना दिलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला वेगळं नाव आणि वेगळं चिन्ह देण्यात आलं.

आता उद्धव ठाकरे संपणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मात्र उद्धव ठाकरे मैदानात पाय रोऊन उभे राहिले. संकट कितीही मोठं असलं तरी शिवसैनिक माझ्या बाजूने आहेत असा दावा उद्धव ठाकरेंनी वारंवार केला. पक्षात ऐतिहासिक बंडखोरी झाली, बंडखोर आमदारांनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. एवढं असतानाही शिवसेनेच्या काही आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. शिवसेनेतील 16 आमदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबरपणे उभे राहिले.

MLA With Uddhav Thackeray
Maharashtra Political Crisis: अपात्रतेची टांगती तलवार असलेले ते १६ आमदार कोण?

हे आहेत ते 16 आमदार ज्यांनी उद्धव ठाकरेंना दिली साथ

१. सुनील प्रभू

मुंबईचे माजी महापौर असणारे सुनील प्रभू, शिवसेनेचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांचे खाजगी सचिव म्हणून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या प्रभू यांना शिवसेनेनं नगरसेवकपदाची संधी दिली. ४ वेळा नगरसेवक झाल्यानंतर, त्यांनी मुंबईच्या महापौरपदापर्यंत मजल मारली. शिवसेनेनं त्यांच्यावर सध्या मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी दिली आहे.

२. अजय चौधरी

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर लगोलग चर्चेत आलेली काही नावं होती. त्यात अजय चौधरी यांचं नाव होतं. शिवसेनेनं एकनाथ शिंदेंवर पहिली कारवाई केली, ती म्हणजे त्यांना गटनेतेपदावरुन हटवण्यात आलं आणि त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती झाली.

३. आदित्य ठाकरे

युवासेना प्रमुख असलेले आदित्य हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. पहिल्याच आमदारकीत त्यांना मंत्रिपद मिळालं. वरळी मतदार संघाचे आदित्य ठाकरे नेतृत्व करतात.

४. कैलास पाटील

उस्मानाबादचे कैलास पाटीलही २०१९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. शिंदे गटातले आमदार सुरतला जात असताना, आपण लघुशंकेचं कारण सांगून तिथून सुटका करुन घेतली आणि कधी चालत, तर कधी ट्र्कमधून मुंबई गाठली आणि उद्धव ठाकरेंना भेटलो आणि आता त्यांच्यासोबतच आहेत.

५. भास्कर जाधव

उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रं आल्यानंतर शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारं पहिलं मोठं नाव होतं, ते म्हणजे भास्कर जाधव. शिवसेनाप्रमुखांना भेटायला मातोश्रीवर भेटायला आलेल्या जाधवांची भेट लवकर झाली नाही तेव्हा मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करत जाधव यांनी सेनेला रामराम ठोकला.  (Maharashtra Political News)

त्यानंतर २००९ मध्ये ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर गुहागरमधून निवडून गेले. त्यांना राज्यमंत्रीपद, राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद आणि रत्नागिरीचं पालकमंत्री पदही मिळालं. २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्याच तिकिटावर निवडणूक जिंकली.

२०१९ च्या निवडणुकीत त्यांनी हातात शिवबंधन बांधलं आणि आमदारकीची हॅटट्रिक पूर्ण केली. ज्यावेळी भास्कर जाधवांनी शिवसेना सोडली होती, अगदी तशीच परिस्थिती असताना ते उद्धव ठाकरेंसोबत आहेत.

MLA With Uddhav Thackeray
Maharashtra Political Crisis: उद्या येणाऱ्या निकालाबाबत कोण काय म्हणालं? येथे वाचा राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

६. सुनील राऊत

विक्रोळीतून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले सुनील राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू. आपले बंधू शिवसेनेचा किल्ला लढवत असताना, बंडखोर आमदार बंडखोरीसाठी संजय राऊत यांना जबाबदार धरत असताना सुनील राऊत यांनी उद्धव ठाकरेंसोबतच आहेत

७. नितीन देशमुख

एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसोबत सुरतला गेल्यानंतर चर्चेत आलेलं पहिलं नाव होतं, ते म्हणजे नितीन देशमुख. त्यांच्या पत्नीनं देशमुख बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. त्यात त्यांना हार्ट अटॅक आल्याची बातमीही आली. मात्र दोनच दिवसांनी देशमुख राज्यात परतले. (Latest Political News)

त्यांनी आपल्याला जबरदस्ती तिकडे नेल्याचा, अटॅक आल्याचा बनाव रचल्याचा आरोप केला. पत्रकार परिषदेत त्यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचं जाहीर केलं. देशमुख हे अकोल्यातल्या बाळापूर मतदारसंघाचे आमदार असून, ही त्यांची आमदारकीची पहिलीच टर्म आहे.

८.राजन साळवी

सलग तीन वेळा राजापूरमधून निवडून आलेले राजन साळवी, उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जातात. कोकणातून निवडून आलेले जे मोजके आमदार उद्धव यांच्यासोबत आहेत, त्यात साळवी यांचं नाव येतं. राजन साळवी यांची ACB कडून चौकशी सुरु आहे तर रिफायनरीणीच्या भूमिकेवरून ठाकरे गट आणि साळवी यांची भूमिका वेगळी असल्याच पाहाऊला मिळत होत.

९. वैभव नाईक

शिवसेनेचे जायंट किलर म्हणून वैभव नाईक ओळखले जातात. याचं कारण म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी शिवसेना नेते नारायण राणे यांचा तब्बल १० हजार मतांनी धक्कादायक पराभव केला होता. २००९ मध्ये कुडाळ मतदारसंघात राणेंनी नाईक यांचा २४ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र २०१४ ला नाईक यांनी दणक्यात कमबॅक केलं. (Latest Marathi News)

वैभव नाईक यांच्यावर चौकशी सुरु असताना देखील तें ठाकरे गटात कायम राहिले आहेत.

१०. रमेश कोरगावकर

भांडुप वेस्ट या शिवसेनेच्या पूर्वापारच्या बालेकिल्ल्यातून निवडून आलेलय रमेश कोरगावकर यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म आहे. २००२ मध्ये पहिल्यांदा त्यांनी मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश केला होता. ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर कोरगावकर यांना २०१९ च्या निवडणुकीत आमदारकीची संधी मिळाली आणि ती त्यांनी गाजवली.

MLA With Uddhav Thackeray
Who Is Cji Chandrachud: सत्तासंघर्षावर सुनावणी करणारे सरन्यायाधीश चंद्रचूड कोण आहेत? जाणून घ्या

११. रवींद्र वायकर

उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक नाव म्हणजे जोगेश्वरी ईस्टचे आमदार रवींद्र वायकर. फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडलेले वायकर सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

१९९२ मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून धडक मारलेली. त्यानंतर ४ वेळा नगरसेवक, एकदा स्थायी समितीची अध्यक्षपद भुषवल्यानंतर २००९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.

१२. संजय पोतनीस

कलिनाचे आमदार असलेल्या संजय पोतनीस यांची ही दुसरी टर्म. दोन्ही वेळेस पोतनीस हे थोड्या मतफरकानं निवडून आले. २००७ मध्ये नगरसेवक झाल्यानंतर २०११ पर्यंत त्यांनी बेस्टचे चेअरमन म्हणून काम पाहिलं. त्यानंतर २०१४ आणि २०१९ ला ते आमदार म्हणून निवडून आले.

१३. प्रकाश फातर्पेकर

२०१४ पर्यंत शिवसेनेला चेंबूरमध्ये विजय मिळवण्यात अपयश आलं होतं. मात्र २०१४ च्या निवडणुकांमध्ये प्रकाश फातर्पेकर यांनी दोन वेळचे माजी आमदार आणि मुंबई काँग्रेसमध्ये वजन असणाऱ्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला.

१४. राहुल पाटील

१९९० पासून परभणीत शिवसेनेचं वर्चस्व आहे. परभणीतून पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी एमआयएमच्या उमेदवाराला हरवलं होतं, तर २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारचा मोठा मताधिक्यानं पराभव केला होता.

१५. उदयसिंग राजपुत

कन्नडमधून २००४ ला अपक्ष म्हणून लढले आणि अवघ्या २ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. २००९ मध्ये पुन्हा अपक्ष म्हणून लढले आणि यावेळी ४ हजार मतांनी पराभव झाला. २००९ मध्ये बाजी मारलेली मनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी. २०१४ मध्ये हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेनं तिकीट दिलं, तर राजपुत यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. या निवडणुकीत राजपूत फक्त दीड हजार मतांनी पराभूत झाले.

१६. ऋतुजा रमेश लटके

अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानंतर २०२२ मध्ये या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उद्धव ठाकरेंच्या गटाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. (Maharashtra Political Crisis)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com