Gold Silver Price : सुवर्णसंधी ! सोन्याचा भाव नरमला तर चांदीही चकाकली, तपासा आजचे दर

Gold Silver Rate In Maharashtra : मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सात्त्याने वाढ झालेली पाहायला मिळाली.
Gold Silver Price
Gold Silver Price Saam TV
Published On

Sona Chandi Bhav : लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी नवी संधी मिळाली आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सात्त्याने वाढ झालेली पाहायला मिळाली.

परंतु, आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण (Down) झाली आहे.जर तुम्ही सोने (Gold) -चांदी विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज सुवर्णसंधी आहे. जाणून घेऊया आजचा सोन्या चांदीचा दर किती आहे ते

Gold Silver Price
Gold Silver Price : खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तपासा आजचे दर

1. सोन्या-चांदीचा आजचा भाव काय ?

मे महिन्याच्या काळात सोन्या-चांदीच्या भावाने उच्चाकांची पातळी गाठली होती. परंतु आज सोन्याचा दर हा 60 हजारांच्या खाली आलेला आहे. त्यामुळे आज खरेदीदारांचा कल अधिक असेल. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज फ्युचर्स यांनी सांगितले की आज १० ग्रॅम सोन्यासाठी ५९ हजार ८९३ रुपये मोजावे लागतील तर एमसीएक्सवर चांदीचा दर हा आज ७३,८०२ रुपये प्रति किलो तोळा आहे.

Gold Silver Price
Gold Silver Price : खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! सोन्याचा भाव घसरला; तर चांदीही स्थिर, तपासा आजचे दर

तर गुड रिटर्न्सनुसार सराफा बाजारात आज चांदीची ७३,४०० रुपये प्रति किलो आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,२२० रुपये आहे.

2. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी (Silver), जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com