Sona Chandi Bhav : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सात्त्याने वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांची सोनं खरेदी करताना तारांबळ उडाली आहे.
आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जर तुम्ही देखील सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आज दागिने खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील. तसेच दागिने (Jewellery) खरेदी करताना सोन्याची शुद्धता कशी तपासाल जाणून घेऊया.
1. सोन्या-चांदीचा आजचा भाव काय ?
मागच्या दोन दिवसांपासून सराफ बाजारात (Market) सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे. परंतु, आजच्या किमतीत (Money) फारसा फरक दिसून आला नाही. आज 5 जून 2023 सोमवारी, सोन्या व चांदीचे भाव हे जैसे थे आहेत. ना त्यात वाढ झाली आहे ना त्यात कोणतीही घट झालेली आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार शुक्रवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 60,308 रुपये इतके होता. तर या दिवशी सोन्याच्या दरात १४ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. तर चांदीच्या दरात 71,372 रुपये प्रति किलो तोळ्यावर बंद करण्यात आला. आज सकाळच्या किंमत 72,376 रुपये प्रति किलोने सुरु झाला. अशा स्थितीत चांदीच्या दरात एकूण 1004 रुपयांची घसरण नोंदवली गेली.
2. कशा ठरवल्या जातात सोन्याच्या किमती ?
भारतात सोन्या-चांदीची किंमत फ्युचर्स मार्केटच्या ट्रेडिंगनुसार दररोज ठरवल्या जातात. ट्रेडिंग दिवसाचा बंद होत असणारा भाव हा पुढच्या दिवशी सकाळचा दर ठरवतो. परंतु, हे केंद्रीय प्राइस असते यामध्ये वेगवेगळ्या शहरांचे दर निश्चित करण्यात येतात. त्यानंतर किरकोळ विक्रेते हे दागिन्यांमध्ये मेकिंग चार्जेस लावून ग्राहकांना विकतात
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.