लाडक्या बहिणींमुळे ममता बॅनर्जी पुन्हा सत्तेत येणार? वाचा नेमकं विश्लेषण

Lakshmir Bhandar scheme details : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या ‘लक्ष्मीर भांडार’ योजनेचा महिलांवर मोठा प्रभाव दिसत आहे. भाजपच्या ३ हजार रुपयांच्या आश्वासनापेक्षा ही योजना गेमचेंजर ठरणार का? जाणून घ्या सविस्तर विश्लेषण.

West Bengal election 2026 prediction : पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांच्या सत्ताकाळानंतरही ममता बॅनर्जी यांची 'लाडकी बहीण' योजनाच गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. 'लक्ष्मीर भांडार' योजनेतून महिलांना मिळणारी १,५०० रुपयांची थेट मदत, भाजपच्या ३ हजार रुपयांच्या आश्वासनावर भारी पडताना दिसतेय.

१५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात 'अँटी इन्कम्बन्सी'ची (सत्ताविरोधी लाट) चर्चा रंगली होती; मात्र पश्चिम बंगालमध्ये 'लाडकी बहीण' ही योजना गेमचेंजर ठरण्याची चिन्हे आहेत. खरं तर, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने महिलाकेंद्रित अनेक योजना राबवल्या आहेत. 'लक्ष्मीर भांडार' योजनेच्या माध्यमातून २५ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांना १,५०० रुपये दिले जात आहेत. हा हप्ता दर महिन्याला महिलांच्या खात्यात थेट जमा होतोय. एवढंच नाही, तर ममता बॅनर्जींनी कन्याश्री, रूपश्री, स्वास्थ्य साथी, मुक्ती आलो, सुबुज साथी अशा महिला कल्याणाच्या विविध योजना राबवल्या आहेत, ज्यांचा महिला आणि मुलींना थेट फायदा मिळत आहे.

दुसरीकडे, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि बिहारमध्ये 'लाडकी बहीण' योजना गेमचेंजर ठरल्याने, भाजपनेही बंगालमध्ये सत्ता आल्यास गरीब महिलांना ३ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, "देशभरातील २० राज्यांत भाजप आणि एनडीएचे मुख्यमंत्री आहेत, मग त्या राज्यांत महिलांना ३ हजार रुपये का मिळत नाहीत? जे इतर राज्यांत शक्य नाही, ते बंगालमध्ये कसं शक्य होईल?" असा सवाल बंगाली नागरिक उपस्थित करत आहेत. मिळत असलेला निश्चित लाभ सोडून केवळ आश्वासनांवर बंगाली जनता विश्वास ठेवण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात विरोधकांनी दुप्पट लाभाची घोषणा करूनही 'लाडकी बहीण' जशी सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली, तोच पॅटर्न बंगालमध्ये रिपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com