वृत्तसंस्था : यूपीतील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसक चकमकीनंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रविवारी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर खेरी येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, त्याआधी तेथे गोंधळ झाला. एकूण ८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर या परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
हे देखील पहा-
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी टीकोनिया पोलीस स्टेशनमध्ये अजय मिश्राचा मुलगा आशिष याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोप करण्यात आला आहे, की जेव्हा शेतकरी निषेधासाठी गेले होते. त्याचवेळी कारने त्यांना तुडवले. या दरम्यान, ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर हिंसाचारात एकूण ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या प्रकरणी आशिष मिश्रा यांच्यासह १४ जणांविरोधात खून, गुन्हेगारी कट आणि दंगल यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी त्यांचा मुलगा आशिष मिश्रा गाडी चालवत असल्याचा आरोप फेटाळला आहे.अजय मिश्रा यांनी काही समाजकंटकांना दोष दिला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.