Raigad; ग्राहकांची इलेक्ट्रिक बाईकला पसंती, मागणी वाढली

इलेक्ट्रिक बाईक खरेदीकडे कल अधिक
Raigad; ग्राहकांची इलेक्ट्रिक बाईकला पसंती, मागणी वाढली
Raigad; ग्राहकांची इलेक्ट्रिक बाईकला पसंती, मागणी वाढलीराजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : सतत वाढत असलेले पेट्रोलचे दर, वाढलेल्या मोटार बाईकच्या किंमती यामुळे दुचाकी वाहने चालविणेही सर्वसामान्यांना कठीण झाले आहे. शासनाने ही आता यावर पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहन धोरण राबविण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे रायगडातील ग्राहकांचा आता इलेक्ट्रिक बाईक खरेदीकडे कल वाढताना दिसत आहे. पर्यावरणपूरक, प्रदूषणविरहित आणि चार्जिंग करून चालणारी इलेक्ट्रिक बाईकमुळे पैशाची बचत होत असल्याने, ग्राहकांची पसंती आता इलेक्ट्रिक बाईकला वाढलेली आहे.

रायगडात साधारण साडे सहाशे इलेक्ट्रिक बाईक ग्राहकांनी वर्षभरात खरेदी केले आहेत. तर हजारो ग्राहकांनी बुकिंग केलेली आहे. पेट्रोल दर हे शंभरी पार झाले आहेत. रोज पेट्रोल दर हे पैशाने वाढत आहेत. त्यातच १ ऑक्टोबर पासून दुचाकीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. इंधन दरवाढ, वाहनाची वाढती किंमत यामुळे खिशाला परवडेल अशा वाहनाची खरेदी करण्याकडे आता ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. इलेक्ट्रिक बाईक ही एकदा चार्जिंग केली की साधारण ३० ते १०० किमीपर्यत धावते.

हे देखील पहा-

चार्जिंग खर्चही कमी येत असल्याने साधारण ५ ते ६ रुपयात बॅटरी ही घरच्या घरी चार्ज करता येणार आहे. त्यामुळे आर्थिक बचतही होत आहे. मोटार सायकल यांना एव्हरेज मिळत असला, तरी त्याच्या किंमती वाढल्या आहेत. त्यातच पेट्रोल दरवाढ होत आहे. यामुळे खिशाला चाट बसत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक या प्रदूषण विरहित आणि कमी खर्च देणाऱ्या असल्याने इलेक्ट्रिक बाईक घेणे महत्वाचे आहे. रायगडात ओकिनोव्हा कंपनीचे २ शोरूम असून १ अलिबाग आणि २ पनवेल या ठिकाणी आहे. आतापर्यत साडे सहाशे इलेक्ट्रिक बाईक या विक्री झाले आहेत.

Raigad; ग्राहकांची इलेक्ट्रिक बाईकला पसंती, मागणी वाढली
बुलढाणा थरारक..! धावत्या एस टी बस चे निखळले चाक...

लो मॉडेलला आरटीओ नोंदणीची गरज नाही, तर हाय मॉडेलला आरटीओ परवानगी घ्यावी लागत आहे. शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलांना लो मॉडेल हे उत्तम असून त्याचा स्पीड ही २५ किमी एवढा कमी असून इलेक्ट्रॉनिक असल्याने पेट्रोल बचत होत आहे. यामुळे पालकांचे पैसे ही वाचत असून स्पीड कमी असल्याने अपघाताचे धोकेही नाहीत.

सध्या या वाहनांना ग्राहकांची मागणी असून, बुकिंग केली जात आहे. मात्र, कोरोनामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रालाही फटका बसला असल्याने काही स्पेअर पार्ट उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना वाहन देण्यास दिरंगाई होत आहे. सध्याच्या शासनाच्या इलेक्ट्रिक धोरणाच्या अनुषंगाने इलेक्ट्रिक वाहनांची पसंती ग्राहकांमध्ये वाढली आहे. यामुळे आर्थिक बचतीसह प्रदूषण रोखण्यात ही वाहने फायदेशीर ठरत आहेत. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक बाईक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिसतील यात शंका नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com