Kuno National Park: कुनो नॅशनल पार्कमधून वाईट बातमी; नामीबियातून आणलेल्या चित्याच्या आणखी दोन पिल्लांचा दुर्दैवी मृत्यू

Kuno National Park : कुनो नॅशनल पार्कमधून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. नामीबियातून आणलेल्या चित्याच्या आणखी दोन पिल्लांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
Kuno National Park  Two More Namibiyan Cheetah Cubs Reported Dead
Kuno National Park Two More Namibiyan Cheetah Cubs Reported Dead Saam TV
Published On

Kuno National Park : कुनो नॅशनल पार्कमधून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. नामीबियातून आणलेल्या चित्याच्या आणखी दोन पिल्लांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. यापूर्वी 23 मे रोजी एका शावकाचाही मृत्यू झाला होता. नुकतेच ज्वाला नावाच्या मादी चित्याने ४ शावकांना जन्म दिला. यापैकी एका पिल्लाचा मृत्यू झाला होता. परिस्थिती पाहता उर्वरित ३ पिल्ले आणि मादी चित्ता ज्वाला यांना वन्यजीव डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. (Kuno National Park Two More Namibiyan Cheetah Cubs Reported Dead)

Kuno National Park  Two More Namibiyan Cheetah Cubs Reported Dead
UP Maid Viral News: आधी बादलीत केली लघुशंका, नंतर त्याच पाण्यानं घर पुसलं; मोलकरणीच्या किळसवाण्या कृत्याचा VIDEO व्हायरल

मात्र, आज यामधील आणखी दोन पिल्लांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. यासह कुनो नॅशनल पार्कमध्ये आत्तापर्यंत ३ शावक आणि ३ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, महिन्याभरात चित्यांच्या पिल्लांचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना असल्याने सरकारच्या प्रोजेक्ट चितावर सवाल उपस्थित केले जात आहेत.  (Breaking Marathi News)

याबाबत मध्य प्रदेशच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी सांगितले की, २३ मे रोजी उष्णता जास्त असल्याने तिन्ही शावकांची तब्येत खालावली होती. ही बाब लक्षात घेता वन्यजीव डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ तिन्ही पिल्लांवर योग्य ते उपचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यादरम्यान दोन शावकांची प्रकृती गंभीर झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Kuno National Park  Two More Namibiyan Cheetah Cubs Reported Dead
Nanded Crime News: नांदेडमध्ये सैराटची पुनरावृत्ती? प्रेमीयुगुलाचे मृतदेह नदीकाठी आढळले; परिसरात खळबळ

चिंताजनक बाब म्हणजे, अजूनही एका शावकाची प्रकृती गंभीर असून त्याला पालपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहेत. त्याच्यावर डॉक्टरांचे एक पथक सातत्याने उपचार करत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. इतकंच नाही, तर उपचारासाठी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील चित्ता तज्ज्ञ आणि डॉक्टरांचा (Doctor) सल्लाही घेतला जात आहे. त्याचबरोबर मादी चिताही निरोगी असून तिलाही निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होतं. हे सर्व चित्ते आपल्या नव्या घरी रुळले होते. हे चित्ते शिकारदेखील व्यवस्थितपणे करत होते. फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेहून १२ चित्ते आणण्यात आले. यामध्ये ७ नर आणि ५ मादी चित्त्यांचा समावेश आहे. त्यांना देखील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे. मात्र, यातील ४ चित्त्यांचा आता मृत्यू झाला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com