Viral Video : गुटख्याची पाकीटं फोडली अन् पठ्ठ्याचं नशीबच फळफळलं; वाचा नक्की घडलं तरी काय?

कल्पना करा, तुम्ही काही रुपये किमतीचे गुटख्याचे पाकीटं घेतले आणि ते फोडल्यानंतर त्यातून शंभरच्या डॉलरची नोट बाहेर आली, तर तुम्ही काय कराल.
Viral Video
Viral Video Saam Tv
Published On: 

Kolkata Viral Video : कल्पना करा, तुम्ही काही रुपये किमतीचे गुटख्याचे पाकीटं घेतले आणि ते फोडल्यानंतर त्यातून शंभरच्या डॉलरची नोट बाहेर आली, तर तुम्ही काय कराल. अशीच काहीशी घटना कोलकत्ता येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video
Funny Viral Video: मृत्यूचं निमंत्रण घेऊन निघाली रिक्षा; सत्य पाहून पोलिसही चक्रावले

कोलकत्ता (Kolkata) विमानतळावर (Airport) कस्टमच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकला (Bangkok) जात असलेल्या सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्यांना गुटख्याची पाकिटं सापडली. मोठ्या प्रमाणात असलेली पाकीटं पाहून कस्टम अधिकाऱ्यांना संशय आला.

अधिकाऱ्यांनी जेव्हा गुटख्याची पाकीटं उघडण्यास सुरुवात केली तेव्हा त्यात तब्बल 400 अमेरिकन डॉलर सापडले. या 400 अमेरिकन डॉलर्सची (Dollar) भारतीय रुपयात गणना केली तर ही रक्कम सुमारे 32.78 लाख रुपये इतकी आहे.अधिकाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आहे.

Viral Video
Viral Video: भाऊ जोमात पब्लिक कोमात! Traffic, तुफान गर्दी अन् पठ्ठ्या थेट टपावरचं प्यायला बसला; Video बघून डोक्यावर हात माराल...

या कारवाईचा व्हिडीओ कस्टम विभागाकडून शेअर करण्यात आला आहे. त्यात अधिकारी गुटख्याची पाकिटं उघडताना दिसत आहेत. या पाकिटांमधून अमेरिकन डॉलर बाहेर पडत आहेत.

गुटख्याच्या पाकिटांमध्ये अमेरिकन डॉलर निघाल्यानं अधिकाऱ्यांची सुध्दा चांगलीचं तारांबळ उडाली. सध्या पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीची कसुन चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर आरोपी एखाद्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य आहे का, याचा देखील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.