Funny Viral Video: मृत्यूचं निमंत्रण घेऊन निघाली रिक्षा; सत्य पाहून पोलिसही चक्रावले

वाहनचालकाने केलेली करामत पाहून वाहतूक पोलीस देखील चक्रावले आहेत.
Viral Video
Viral VideoSaam TV
Published On: 

Viral Video: वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असते. नियम न पाळल्यास आपल्याच निष्काळजीपणामुळे काही व्यक्ती स्वतःचा आणि दुसऱ्यांचाही जीव धोक्यात टाकतात. वाहतुकीचे नियम मोडल्यावर एकदा का कोणी वाहतूक पोलिसांच्या तावडीत सापडलं तर त्याचा खिसा पूर्ण रिकामा झाल्याशिवाय राहत नाही. अशात वाहतुकीचे नियम मोडत काहींना दुचाकीवर जबदस्त स्टंट करताना तुम्ही पाहिले असेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. यात वाहनचालकाने केलेली करामत पाहून वाहतूक पोलीस देखील चक्रावले आहेत. (Latest Viral Video)

एका रिक्षामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्ती मागे आणि चालकाजवळ एक असे एकूण ५ व्यक्ती आरामात बसू शकतात. याच्यापेक्षा जास्त व्यक्तींना रिक्षातून प्रवास करणे फार कठीण आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी पकडलेल्या रिक्षामध्ये ७ ते ८ नाही तर तब्बल १९ व्यक्ती प्रवास करत होते. रिक्षा चालकाचा हा व्हिडिओ पोलिसांनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळत प्रवास केला पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे असे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.

Viral Video
Viral Video : व्हिडिओ काढण्याच्या नादात ती वाघाला घेऊन खाली बसली, पुढे जे घडलं ते पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

भागवत प्रसाद पांडे नावाच्या पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच याला त्यांनी लिहिले आहे की, "अधिक सवारी दुर्घटनेची तयारी..." हा व्हिडिओ त्यांनी मस्त फनी अँगलने एडिट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक रिक्षा माणसांनी तुडुंब भरून चालली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस त्या रिक्षाला अडवतात. रिक्षा एवढी कशी काय भरली असं विचारत ते सर्वांना खाली उतरण्यास सांगतात. यात खाली उतरल्यावर पोलीस या सर्व व्यक्तींना मोजतात तेव्हा त्यांची संख्या चक्क १९ पर्यंत पोहचते. हे पाहून पोलिसही चक्रावतात आणि म्हणतात हे बघा सगळे आपल्या मरणाला निमंत्रण द्यायला चालले आहेत.

सदर व्हिडिओ (Video) हा उत्तरप्रदेशचा आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यापासून युजर्सने त्यावर लाइक्स आणि हसण्याच्या इमोजिंचा वर्षाव केला आहे. ५५ सेकंदाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. आता पर्यंत ६ हजार व्यक्तींनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर अनेकजण यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही व्यक्तींनी वाहन चालकावर कारवाई करावी असे म्हटले आहे. तर काहींनी त्याला मृत्यूच्या दारात घेऊन जाणारं रत्न द्यावं असं म्हटलं आहे. तर एकाने शासनावर बोट ठेवत पेट्रोल इतकं महाग झालंय की, सामान्य जनता तरी काय करणार असं लिहिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.