अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरीचा वाद शमतो ना शमतो तोच आता वाराणसीच्या प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोन्याच्या कलशावरून नवा वाद पेटलाय...काशी विश्वनाथ मंदिरावरील सोन्याचे कलश गायब झाल्याचा खळबळजनक दावा वकील नित्यानंद राय यांनी केलाय...आरोपात वकील नित्यानंद राय यांनी काय म्हटलयं..पाहूयात...
काशी विश्वनाथ मंदिराचे सोन्याचे कळस चोरीला?
मंदिर शिखरावरील सोन्याचे कळस गायब केल्याचा आरोप
अधिवक्ता नित्यानंद राय यांची पीएमओकडे तक्रार
मंदिराच्या उत्तर द्वारावरचे 2-3 ठिकाणचे सोन्याचे कळस गायब
चोरी केलेल्या जागी सोनेरी रंग दिल्याचा दावा
मंदिर प्रशासनानं श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी
सोने-चांदीचा संपूर्ण तपशील वेबसाईटवर सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केलीय...
दरम्यान वकील नित्यानंद राय यांनी केवळ तक्रारच केली नाही, तर मंदिरातून आतापर्यंत किती सोने-चांदी गायब झाले याचा खुलासा करण्यासाठी प्रशासनाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलयं... मात्र, दुसरीकडे मंदिर प्रशासन आणि वाराणसीच्या मंडलायुक्तांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत...
चोरीवर काशी विश्वनाथ मंदिर मंडलआयुक्तांचे स्पष्टीकरण- HDR
मंदिरातील सोनं चोरीचे सर्व आरोप खोटे
3 महिन्यांपूर्वीच्या गारपिटीत कळसाचा काही भाग कोसळला
नुकसानग्रस्त भाग मंदिर प्रशासनानं सुरक्षित ठेवला
तुटलेल्या कळसाच्या पुनर्स्थापनेसाठी IIT मद्रासच्या टीमकडून सर्व्हे
वैज्ञानिक चाचणीअंती कळस पुन्हा बसवणार
दुसरीकडे काशी विश्वनाथ मंदिरातील या कथित चोरीवरून महाराष्ट्रात चांगलचं राजकारण तापलयं...मोदींच्या लोकांनीच सोन्याचा कळस चोरला, अशी जहरी टीका ठाकरेसेनेच्या राऊतांनी केलीय...तर मोदी मंदिरं बांधणारे आहेत, असं प्रत्युत्तर भाजपनं दिलयं.....
राममंदिरातील चोरीवरून विरोधकांनी संसदेत सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा चांगलाच प्रयत्न केला होता...अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातील काशी विश्वनाथमध्ये खरचं सोन्याचा कळस चोरी झाला असल्याचं उघड झालं तर विरोधक आणखी आक्रमक होतील...त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.