Belgaon News : महाराष्ट्र कर्नाटक-सीमावाद पेटणार? ठाकरेंच्या ४ नेत्यांवर बेळगावमध्ये बंदी

Maharashtra Ekikaran Samiti : आजपासून कर्नाटक राज्य सरकारचं बेळगाव इथं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याचवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होत आहे.
Maharashtra - Karnataka Border Dispute
Maharashtra - Karnataka Border Dispute
Published On

maharashtra karnataka Belagavi border dispute : आज बेळगाव मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. बेळगाव जिल्ह्यात कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चार नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार, विजय देवणे, सुनील शिंत्रे, सुनील मोदी या नेत्यांना दोन दिवस बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

या चार शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्था संदर्भात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने बेळगाव प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पण हे नेते बेळगावला जाण्यावर ठाम आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि बेळगाव येथील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आजपासून कर्नाटक राज्य सरकारचं बेळगाव इथं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारने बेळगाव इथे जय्यत तयारी केलेली आहे. तसेच बेळगाव परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलेला आहे. तर सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव इथं महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला महाराष्ट्रातून नेते येऊ नयेत यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील नेत्यांवर बेळगाव जिल्ह्यात बंदी घातलेली आहे.

Maharashtra - Karnataka Border Dispute
Border Dispute : सीमावाद पुन्हा पेटणार? कर्नाटक सरकारने घेतला मोठा निर्णय; अमित शहांची मध्यस्थी व्यर्थ?

आज सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरातून बेळगावच्या दिशेने महा मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक रवाना होणार आहेत. सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील ताराराणी चौक परिसरातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक हद्दीवर अर्थात कोगनोळी नाका इथं कर्नाटक पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सकाळी या परिसरातून कोणतेही कार्यकर्ते बेळगावच्या हद्दीत घुसू नयेत यासाठी त्यांची धरपकड ही होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com