कॅबिनेट मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Karnataka Minister B Nagendra Resignation Latest News And Political Reaction: कर्नाटक सरकारमधील योजना आणि सांख्यिकी मंत्री बी. नागेंद्र यांनी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास निगम घोटाळ्याप्रकरणी वाढत्या दबावानंतर मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. राजीनाम्याची घोषणा करताना पत्रकार परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले.
KARNATAKA MINISTER B NAGENDRA RESIGNS AMID VALMIKI SCAM PRESSURE
KARNATAKA MINISTER B NAGENDRA RESIGNS AMID VALMIKI SCAM PRESSUREsaam tv
Published On

कर्नाटक सरकारमधील योजना आणि सांख्यिकी मंत्री बी. नागेंद्र यांनी वाल्मिकी अनुसूचित जमाती विकास निगमन घोटाळ्याप्रकरणी वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा करताना बी. नागेंद्र यांना अश्रू अनावर झाले.

याच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील नव्या काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळात बी. नागेंद्र यांचा पुन्हा समावेश करण्यात आला होता. मात्र राजीनाम्याची घोषणा करताना नागेंद्र यांनी आपल्याला एका मोठ्या राजकीय कटाचा भाग म्हणून लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. बी. नागेंद्र यांनी भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून दबाव टाकण्याचा आरोप केला.

KARNATAKA MINISTER B NAGENDRA RESIGNS AMID VALMIKI SCAM PRESSURE
९० कोटींच्या घोटाळ्यात मंत्री अडकला, सीबीआयचा थेट राज्यपालांकडे अर्ज, राजकारणात खळबळ

ते म्हणाले, भाजप मला ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून घाबरवू शकत नाही. तसेच आदिवासी समाजातून पुढे येणाऱ्या व्यक्तीला मनुवादी शक्ती पाहू इच्छित नसल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मनुवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी आपण अजून ताकदीने लढू असे नागेंद्र म्हणाले. बी. नागेंद्र यांनी कर्नाटकच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये आदिवासी कल्याण मंत्री होते. जून 2024 मध्ये कथित घोटाळ्याशी संबंधित वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com