Karnataka Election: कर्नाटकात काँग्रेस जिंकली तर कोण होणार मुख्यमंत्री? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितलं...

DK Shivkumar News: कर्नाटकातील विजयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मार्ग मोकळा होईल असेही यावेळी बोलताना शिवकुमार म्हणाले.
D. K. Shivakumar
D. K. Shivakumarsaam tv
Published On: 

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 140 हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करू असा दावा कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार (DK Shivkumar) यांनी केला. तसेच मुख्यमंत्री कोण होणार याबाबत देखील त्यांनी उत्तर दिले आहे. पक्ष जो निर्णय घेईल, तो आपल्यााल मान्य असेल असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

कर्नाटकातील विजयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मार्ग मोकळा होईल असेही यावेळी बोलताना शिवकुमार म्हणाले. कर्नाटकातील जनता काँग्रेसला साथ देऊन संपूर्ण देशाला संदेश देईल. कर्नाटकात काँग्रेस विजयी स्थितीत आहे. मात्र, यावेळीही माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. दरम्यान शिवकुमार यांनी सध्या पक्षाचा विजय निश्चित करण्याचा आपला प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

D. K. Shivakumar
CSK Vs MI, IPL 2023: धोनीच्या बालेकिल्ल्यात मुंबईची दाणादाण; चेन्नईला विजयासाठी १४० धावांचं लक्ष

कर्नाटकातील काँग्रेस नेतृत्व एकसंध - शिवकुमार

डीके शिवकुमार म्हणाले की माझ्यासाठी पक्ष आधी येतो आणि मुख्यमंत्रीपद नंतर येते. मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावर पक्ष जो काही निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल. कर्नाटक काँग्रेसमधील मतभेदाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. कर्नाटकातील काँग्रेस नेतृत्व एकसंध आहे हे सत्य आहे. कार्यकर्ते सक्रिय आहेत. काँग्रेसला बहुमत मिळावे यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करत आहोत, अशी प्रतिक्रिया डी के शिवकुमार यांनी दिली आहे.

काँग्रेस 141 जागा जिंकेल?

कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख शिवकुमार गेल्या तीन वर्षांपासून काँग्रेस कर्नाटकात जमिनीवर मेहनत घेत आहे. कर्नाटकात 'भारत जोडो यात्रा' यशस्वी झाली. या निवडणुकीत काँग्रेसला 141 जागा मिळतील आणि भाजप 60 जागांच्या खाली जाईल असा दावा त्यांनी केला आहे. कर्नाटकची निवडणूक आम्ही अगदी आरामात जिंकू असे ते म्हणाले. (Karnathka Elections)

D. K. Shivakumar
Weather Forecast: गारपीटीनंतर आता विदर्भाला उन्हाचे चटके! तापमान 45 पार जाण्याची शक्यता

'भाजपचा खोटं बोलून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न'

भाजप सरकार तरुणांना नोकऱ्या देऊ शकले नाही, जनतेला महागाईतून दिलासा देऊ शकले नाही. आता ते चिथावणीखोर गोष्टी बोलून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप डीके शिवकुमार यांनी केला. तसेच भाजपने दिलेल्या यूसीसी आणि एनआरसीच्या आश्वासनांबाबत बोलताना ते म्हणाले की कर्नाटक निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर लढवली जात आहे. या निवडणुकीत भाजपला कोणतेही अश्वासन देण्यात अपयश आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com