

झारखंडमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. देवदर्शनाला जात असताना या भाविकांवर काळाने घाला घातला. रामगढ जिल्ह्यातील रांची-पाटणा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे ही घटना घडली. मृतांमध्ये ४ मुलं, ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. हा अपघात इतका भयंकर होता की कारचा चुराडा झाला. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण समोर आले नाही. पोलिस सध्या तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे २ वाजताच्या सुमारास घडला. कुजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांकी येथे भाजप कार्यालयाजवळ हा अपघात झाला. नालंदा जिल्ह्यातील जांघारो गावातून राजरप्पाकडे एका कारमधून १४ जण प्रवास करत होते. महामार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने दुसऱ्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर कार महामार्गावर उलटली. या अपघातामध्ये १३ जणांचा जागीच मृत्यू झाला.अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होते. ते सर्वजण राजरप्पा मंदिरात दर्शनासाठी जात होते.
या कराने दुसऱ्या वाहनाला इतक्या जोरात धडक दिली की कारचा चुराडा झाला. कारमध्ये असलेले अनेक जण आतमध्येच अडकले आणि त्यांनी जागीच प्राण सोडले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. कारचा चुराडा झाल्यामुळे मृतदेह आतमध्येच अडकले होते त्यांना बाहेर काढणं देखील कठीण झाले होते. पोलिसांनी या सर्व मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
दोन्ही वाहनांमध्ये टक्कर इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान झाले होते. या अपघातामुळे १३ जणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामध्ये एक जण जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी रामगड सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये चार मुले, चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत व्यक्ती बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील होते. गावकरी आणि मृतांचे कुटुंबीय या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.