Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांवरील हल्ले सुरूच आहेत.
Jammu-Kashmir Latest News File Photo
Jammu-Kashmir Latest News File PhotoSAAM TV
Published On

Jammu-Kashmir Latest News : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांवरील हल्ले सुरूच आहेत. दहशतवाद्यांनी पुन्हा काश्मिरी पंडितावर हल्ला केला आहे. शोपियांमध्ये दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

पूरन कृष्ण भट असे मृताचे नाव आहे. शोपियांच्या चौधरी गुंड येथील ते रहिवासी होते. घराच्या लॉनमध्ये असताना दहशतवाद्यांनी (Terrorist) त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दहशतवाद्यांनी शनिवारी त्यांच्यावर हल्ला केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Tajya News)

पोलिसांच्या (Police) माहितीनुसार, पूरन कृष्ण यांच्या हत्येनंतर तात्काळ परिसरात नाकाबंदी करण्यात आली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, दक्षिण काश्मीरच्या शोपियांमध्ये यापूर्वीही दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित सुनील कुमार भट यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याआधी ३१ मे रोजी कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका सरकारी महिला कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यापूर्वी १२ मे रोजी काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी राहुल भट यांचीही गोळ्या झाडून हत्या केली होती.

बांदीपुरा जिल्ह्यात आयइडी हस्तगत

जम्मू-काश्मीरमध्ये बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शनिवारी आयइडी हस्तगत केले. अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. आयइडी १६ किलो होते. पोलीस आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त पथकाने उत्तर काश्मीर जिल्ह्यातील अस्तांगो परिसरातून आयइडी जप्त केले. त्यानंतर ही स्फोटके नष्ट करण्यासाठी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com