Kupwara Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक; सैन्य दलाचा १ जवान शहीद, एका दहशतवाद्याचाही खात्मा

Kupwara Terror Attack Today : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. या घटनेत सैन्य दलाचा १ जवान शहीद झाला आहे. तर एका दहशतवाद्याचाही खात्मा झाला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक; सैन्य दलाचा १ जवान शहीद, एका दहशतवाद्याचाही खात्मा
Jammu Kashmir Terror AttackSaam Digital
Published On

जम्मू-काश्मीर :

जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली. कुपवाडा भागात अनेक दहशतवादी लपल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याचाही खात्मा केला आहे. तर या चकमकीत ४ जवान जखमी झाले आहेत. तर १ जवान शहीद झाला आहे.

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामधील चकमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. या चकमकीनंतर सैन्य दलाने म्हटलं की, 'उत्तर काश्मीरच्या कुपवाडामध्ये माछिल भागात गोळीबार झाला. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. तर घटनास्थळावरील जवानही जखमी झाले आहेत'.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक; सैन्य दलाचा १ जवान शहीद, एका दहशतवाद्याचाही खात्मा
Bear Attack : अस्वलाच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी; गुरे चार्ट असताना अचानक हल्ला

सुरक्षा दलाला कुपवाडामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यामुळे मागील दिवसानंतर सैन्य दलाकडून दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन सुरु होतं. दहशतवाद्यांकडून BAT हल्ला सुरु होता. BAT हल्ला म्हणजे बॉर्डर अॅक्शन टीम. या टीममध्ये पाकिस्तानी सेनेचे कमांडो आणि दहशतवादी सामील असतात. या टीममधील दहशतवादी एलओसीवर घुसखोरीचा प्रयत्न करतात.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक; सैन्य दलाचा १ जवान शहीद, एका दहशतवाद्याचाही खात्मा
Washim Dog Attack: पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस! ८ जणांचे लचके तोडले; तीन चिमुकल्यांसह महिला गंभीर जखमी

BAT म्हणजे काय?

BAT टीममध्ये पाकिस्तानी सैन्य दलाचे नियमित जवान सामील असतात. त्यात SSG कमांडो देखील सामील असतात. ते दहशतवादी संघटनांची मदत घेऊन काम करतात. एका रिपोर्टनुसार, या टीममध्ये ५०-५५ दहशतवादी हे २-३ दहशतवाद्यांच्या तुकड्यांमध्ये काम करतात. या दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवरही पाठिंबा मिळतो.

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा चकमक; सैन्य दलाचा १ जवान शहीद, एका दहशतवाद्याचाही खात्मा
jammu and kashmir accident : जम्मू-काश्मीरमध्ये जानेवारी ते मार्चपर्यंत १२१४ रस्ते अपघात; आतापर्यंत १८५ जणांचा मृत्यू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैन्य दल आणि अन्य सुरक्षा यंत्रणा घुसखोरांना रोखण्यासाठी प्लान आखण्यास सुरुवात केली आहे. आंतराष्ट्रीय सीमेवर घुसखोरांना रोखण्यासाठी तपासणी देखील सुरु करण्यात आली आहे. तसेच दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सैन्य दलाची विशेष पथकावर स्पेशल ट्रेनिंग देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com