Jaipur Gas Tanker Fire : जयपूरमध्ये दोन टँकरची एकमेकांना धडक, अपघातात ११ जणांचा मृत्यू; ४० गाड्या जळून खाक

Jaipur Gas Tanker Fire update : जयपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. गॅस टँकरच्या झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात ४० गाड्या जळून खाक झाल्या आहेत.
जयपूरमध्ये दोन गॅस टँकरची एकमेकांना धडक, अपघातात ११ जणांचा मृत्यू; ४० गाड्या जळून खाक
Jaipur Gas Tanker Fire Saam tv
Published On

जयपूरमधून मोठं वृत्त हाती आलं आहे. जयपूरच्या अजमेरमध्ये शुक्रवारी पहाटे ६ वाजता भीषण अपघात झाला. या दोन गॅस टँकरचा अपघात होऊन मोठा स्फोट झाला. या घटनेत ११ जण होरपळले. या घटनेनंतर आजूबाजूला असणारे ४० गाड्या जळून खाक झाल्या. स्फोटाच्या भीषण घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

जयपूरमध्ये अजमेरला जाणाऱ्या महामार्गावर सकाळी ६ वाजता भीषण अपघाताची घटना घडली आहे. दोन टँकरचा अपघात झाल्यानंतर जवळ असलेल्या कारखान्याला आग लागली. त्यानंतर कारखान्याला लागलेली आग वेगाने पसरू लागली. परिसरातील आग वेगाने पसरल्याने ३५ हून अधिक वाहनांनाही आग लागली. या भीषण आगीत वाहनांमध्ये बसलेले प्रवासी होरपळले. आग लागल्यानंतर काहींनी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस प्रशासनाने तातडीने रेस्कू ऑपरेशन सुरु केलं. या भीषण घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

जयपूरमध्ये दोन गॅस टँकरची एकमेकांना धडक, अपघातात ११ जणांचा मृत्यू; ४० गाड्या जळून खाक
Jalgaon Accident: भरधाव कार झाडाला धडकली, सावद-भुसावळमधील घटना, तिघांचा मृत्यू
जयपूरमध्ये दोन गॅस टँकरची एकमेकांना धडक, अपघातात ११ जणांचा मृत्यू; ४० गाड्या जळून खाक
Malkapur Accident : गॅस टँकर व कंटेनरची समोरासमोर धडक; मोठी दुर्घटना टळली, अपघातात दोघे गंभीर जखमी

जयपूर-अजमेर महामार्गावर दिल्ली पब्लिक स्कूलजवळ एलपीजी गॅसचा टँकर अजमेरहून जयपूरकडे निघाला होता. चालकाने अचानक टँकर वळवत होता. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी अचानक ब्रेक दाबले. याचवेळी दोन गॅस टँकरची एकमेकांना धडक झाली. ही घटना इतकी भीषण होती की, या टँकरमधील गॅस परिसरात पसरला. त्यानंतर आग लागली. काही वेळात सर्वत्र आग पसरली. या आगीचा सर्वत्र भडका उडाला.

जयपूरमध्ये दोन गॅस टँकरची एकमेकांना धडक, अपघातात ११ जणांचा मृत्यू; ४० गाड्या जळून खाक
Palghar Crime: पालघर हादरले! घरी सोडतो सांगत जंगलात नेले, तरुणीसोबत भयंकर घडलं

अपघातानंतर क्षणार्धात ४० वाहने जळून खाक झाली. ही आग थेट २०० मीटरपर्यंत पोहोचली. या आगीच्या घटनेनंतर लोक थेट १ किलोमीटर दूर पळाले. या आगीच्या घटनेत ३२ जण गंभीर जखमी झाले. त्यातील ५ जणांना डॉक्टरांनी आधीच मृत घोषित केले. तर ५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका रुग्णाने जयपुरिया रुग्णालयात प्राण सोडला. अपघातादरम्यान, एका बसमध्ये ३४ जण होते. त्यातील २१ जणाची माहिती हाती आली आहे. तर अद्याप १३ जणांविषयी माहिती हाती आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com