Dombivli fire : डोंबिवलीत आगीचं सत्र सुरुच; गोदामाला भीषण आग, नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह,VIDEO

Dombivli Fire Update : डोंबिवलीत पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीतील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Dombivli fire
Dombivli fireSaam tv
Published On

डोंबिवली : डोंबिवलीत आगीच सत्र सुरुच असल्याचं दिसत आहे. डोंबिवलीतील पूर्वेत सदगुरु ऑटो स्पेअर पार्टच्या गोदामाला गुरुवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत गोदाम पूर्ण जळून खाक झालं आहे. दोन ते तीन तासांनंतर आगीवर नियत्रंण मिळवण्यात यश आलं आहे. डोंबिवली परिसरात वारंवार आग लागण्याच्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवलीतील पूर्व भागात असणाऱ्या सदगुरु ऑटो स्पेअर पार्टचं दुकान आहे. डोंबिवलीतील श्री माऊली प्रसन्न सोसायटीच्या तळमजल्याला दुकानांचे गाळे असून या दुकानाच्या पाठीमागेच सोसायटीमध्ये गोदाम देखील आहे. या गोदामात ऑइल आणि इतर साहित्य ठेवण्यात आले होते. आज गुरुवारी दुपारी ११.३० वाजणाच्या सुमारास दुकानांना आग लागल्याची घटना घडली.

Dombivli fire
Police officer ends life : दीड वर्षापूर्वी बदली, अचानक पोलीस उपनिरीक्षकाने संपवलं जीवन; कारण काय?

या आगीच्या घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि सर्वाची पळापळ झाली. आग लागल्यानंतर आजूबाजूच्या दुकानदारांनी दुकानातील लाकडी सामान बाहेर आणले. दुकानाच्या पाठीमागे असललेल्या गोदामात ऑइल साठा होता. त्यामुळे या आगीने क्षणात रौद्रुरुप धारण केलं.या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

Dombivli fire
Maharashtra Politics : भाजपचा शिंदे गटाला धक्का; विधानपरिषद सभापतिपदासाठी राम शिंदेंचा अर्ज

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या आगीवर नियंत्रण मिळवताना अनेक अडचणी येत होत्या. या घटनेनंतर रामनगर पोलिसांनी इमारतीमधील नागरिकांना बाहेर काढून इमारत रिकामी केली. दोन-तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Dombivli fire
Dombivli Fire: डोंबिवलीत पुन्हा दुर्घटना, सोनारपाड्यात कारखान्याला आग, आकाशात धुराचे लोट, VIDEO

या आगीच्या घटनेनंतर इमारतीत गोदामास परवानगी कशी देण्यात आली? या गोदामात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होती का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

पालघरमध्ये ट्रकला भीषण

पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण ट्रक जळून राख झाला आहे. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्टकटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कासा पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com