Jalgaon Accident: भरधाव कार झाडाला धडकली, सावद-भुसावळमधील घटना, तिघांचा मृत्यू

Savda-Bhusawal Road Accident: भुसावळ जळगाव यावल तालुक्यातील पिंपरूड गावाजवळ एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि दोन जण गंभीर जखमी असल्याचे समोर आले आहे.
Accident News
Accident Newsgoogle
Published On

भुसावळ जळगाव यावल तालुक्यातील पिंपरूड गावाजवळ सावदा रस्त्यावर भुसावळकडून येणाऱ्या होंडा सिटी कारने रस्त्यावर एका लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिली. त्यात कारचा चक्काचूर झाला असून तीन ते चार जण जागीच ठार झाले आहेत. दरम्यान, कारमधील मयत झालेले तीन तरूण भुसावळ येथील मित्राच्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून रावेरकडे परतत होते.

दरम्यान यावेळी ते परतत असताना हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. यातील अन्य दोन जण गंभीर जखमी असून त्यांना सावदा येथील खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आलेलं आहे. रावेर शहरातील शुभम सोनार, वय २५ वर्ष, मुकेश रायपूरकर, वय २३ वर्ष व जयेश भोई हे जागेच ठार झाले. तर इतर गणेश भोई (फोटोग्राफर) सह आणखी एक गंभीर जखमी असुन त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Accident News
Pune Crime: पुण्यातील हृदय पिळवटणारी घटना, चिमूरडीचा गळा दाबून खड्ड्यात फेकण्याचा भयंकर प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार रात्री १२ ते ०१ वाजेच्या सुमारास भुसावळकडून येणाऱ्या MH20CH8002 या क्रमांकाच्या होंडा सिटी कारने सावदा-भुसावळ रस्त्यावरील पिंपरुड सावदा दरम्यानच्या रस्त्यावर एका लिंबाच्या झाडाला जोरदार धडक दिल्याने त्यात कारचा चक्काचूर झाला. होंडा सिटी कारचे मशीनचे पार्ट जवळ-जवळ १०० ते १५० फूट अंतरावर विखुरले गेले.

Accident News
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे लाभ खात्यात जमा झाले का? पैसे कसे तपासायचे जाणून घ्या स्टेप्स

या कार मध्ये पाच ते सहा जण असल्याची माहिती मिळली असून त्यातील ३ ते ४ जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. कारने ज्या झाडाला धडक दिली त्या झाडाची संपूर्ण साल निघून गेली आहे. ही कार रावेर येथील असल्याचीही माहिती मिळत आहे. ते मित्राच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून येत होते.

Accident News
Mumbai News: कुर्ल्यातील हमीदा मानवी तस्करीचे शिकार, पाकिस्तानात पोहोचली अन् युट्यूबर बनला देवदूत

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील बाभळेश्वर जवळ सुद्धा एक अपघात घडला आहे. भरधाव कंटेनर घरात घुसला. नगर मनमाड महामार्गावर धावणारा ट्रक थेट घरात घुसला. पहाटे तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. घरात चारजण झोपलेले होते. सुदैवानेवाने कुणालाही इजा झाली नाही. कापसे कुटूंबीय बालंबाल बचावले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. रस्त्याचे अर्धवट कामही या अपघाताला कारणीभूत आहेत.

Accident News
Egg Price: हिवाळ्यात अंड्यांची मागणी वाढली, डझनचा दर पोहोचला थेट ९६ रुपयांवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com