Egg Price: हिवाळ्यात अंड्यांची मागणी वाढली, डझनचा दर पोहोचला थेट ९६ रुपयांवर

Egg Price Rise: वाढलेली महागाई आणि वाढलेल्या थंडीचा फटका अंडी खाणाऱ्या खवय्यांना बसला आहे. परिणामी मागणी वाढल्यामुळे थंडीच्या दिवसांत अंड्याचे भाव वधारले आहेत.
Egg Price
Egg Priceyandex
Published On

थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत असताना अशातच अंडी खाणाऱ्यांची संख्या वाढते. परिणामी मागणी वाढल्यामुळे थंडीच्या दिवसांत अंड्याचे भाव वधारले आहेत. दीड महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात ३० अन्डीचा कॅरेट १६० रुपयांच्या दरात मिळत होता. मात्र, आता हा दर १९० रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे प्रती अंडा एका रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या दराचा थोडा का होईना ग्राहकांना फटका बसणार आहे.

महागाई सुद्धा दिवसेंदिवस गगनाला भिडत चालली आहे. त्यामुळे सामन्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. जीवनावश्यक सर्वच वस्तूंवर महागाईच्या झळा बसत आहेत. थंडीचा जोर पाहून अंड्याचाही भाव वाढत आहे. तरीही अंडी खाणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही ती वाढतच चालली आहे. पूर्वी ६ रुपयांना मिळणारे एक अंडे आता ८ रुपयांना विकले जात आहे. तसेच, ७२ रुपयांना मिळणारी डझन अंडी आता तब्बल ९६ रुपयांना विकली जात आहेत. या दरवाढीमुळे सामान्य जनतेवर आर्थिक भार वाढणार असल्याचे स्पष्ट आहे.

Egg Price
Pune Crime: पुण्यातील हृदय पिळवटणारी घटना, चिमूरडीचा गळा दाबून खड्ड्यात फेकण्याचा भयंकर प्रकार

गेल्या वर्षी पाच ते सहा रुपयांना नग मिळणारे अंडे गेल्या महिन्यात सात रुपयांना मिळत होते. आता हेच एक अंडे आठ रुपयांना झाले आहे. कोंबड्यांचे खाह्य महागल्याने देखील अंड्याचे भाव वाढले आहेत. अजून किमान अडीच महिने ही दरवाढ राहणार आहे. सामान्य लोकांसाठी अंड्यांच्या दरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरत आहे.

Egg Price
Mumbai News: कुर्ल्यातील हमीदा मानवी तस्करीचे शिकार, पाकिस्तानात पोहोचली अन् युट्यूबर बनला देवदूत

अंड्यांच्या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल्स आणि टपऱ्यांवर होणार आहे. ऑम्लेट, अंडाभुर्जी, अंडा-करी यांसारखे पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांना उत्पादन खर्च वाढल्यामुळे त्यांच्या पदार्थांचे दर वाढवावे लागतील. परिणामी, सामान्य ग्राहकांना या पदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे सामान्य लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला आवश्यक प्रथिनांसाठी अंडी खाल्ली जातात. त्यामुळे, अंड्यांच्या दरवाढीमुळे अनेकांना आपल्या आहारात बदल करावा लागणार आहे.

Egg Price
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे लाभ खात्यात जमा झाले का? पैसे कसे तपासायचे जाणून घ्या स्टेप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com