दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी येथे दोन समुदायांमध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी १५ आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. या फरार आरोपींचा (accused) हिंसाचारात मोठा हात असल्याचे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. यातील बहुतांश आरोपींचे मोबाईल बंद असून या १५ आरोपींपैकी ५ जण पश्चिम बंगालमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
हे देखील पाहा-
या आरोपींच्या शोधासाठी पोलिस (Police) छापे टाकत आहेत. पोलिस तपासात त्यांचा हिंसाचारात सहभाग असल्याचे उघड झाले असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे आरोपी हिंसाचाराच्या वेळी दंगल करताना स्पष्ट दिसत आहेत. यातील बहुतांश आरोपी मोबाईलवरून आलेल्या फुटेजमध्येही दिसत आहेत. व्हिडीओ फुटेजनंतर परिसरातील नागरिकांकडून त्यांच्याविषयी माहिती घेतली जात आहे. त्यासोबतच त्यांच्या मोबाईलवरून त्यांचे लोकेशन ट्रेस केले जात आहे. १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती मिरवणुकीत जहांगीरपुरी येथे पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे हिंसाचार झाला, असा आरोप नेत्याने केला.
ही मिरवणूक रोखण्यात दिल्ली पोलीस (Police) पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिल्ली न्यायालयाने या प्रकरणावर म्हटले होते. या मिरवणुकीसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. एवढेच नव्हे तर याप्रकरणी स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी आतापर्यंत ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासोबतच ३ अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.