भीलवाडामध्ये तणाव! प्रशासनाकडून 24 तास इंटरनेट सेवा बंद

एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या
Crime News
Crime News
Published On

भीलवाडा: राजस्थानमधील भीलवाडा येथील कोतवाली पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील शास्त्रीनगर कॉलनीत काल रात्री २ जणांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या (killing) केली आहे. सार्वजनिक ठिकाणी चाकूने वार केल्याच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह (Police) वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आणि तरुणाला एमजी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. (Police Crime Tensions after killing youth in Bhilwara)

रात्री उशिरा पोलिसांना (Police) या प्रकरणात महत्त्वाचे सुगावा लागणार आहेत. यानंतर पोलिसांनी हत्येतील दोघांपैकी एकाला ताब्यात घेतले, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. या घटनेत सहभागी असलेले दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत आहेत.

हे देखील पाहा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलवाडा न्यू हाउसिंग बोर्ड शास्त्रीनगर येथील रहिवासी ओमप्रकाश तापडिया यांचा मुलगा आदर्श (वय-२०) याच्यावर ब्राह्मणी स्वीट्स हाऊसजवळ दोघांनी चाकूने वार करण्यात आले आहेत, त्यानंतर तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला एमजी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श तापडियाचा भाऊ हनीसोबत २ अल्पवयीन मुलांचे भांडण झाले होते. आदर्शला हा प्रकार कळताच त्याने दिवसा भांडण करणाऱ्यांकडे तक्रार केली, त्यानंतर त्यांच्यात मोठे भांडण सुरू झाले. याच कारणावरून आदर्शचा वार करून खून करण्यात आला.

Crime News
बॉयफ्रेंडच्या भावाला वाचवण्यासाठी तरूणी बनली तोतया पोलीस; स्वतःच फसली

भिलवाडा बंदची हाक

आदर्शला भोसकल्याची बातमी समजताच नातेवाईक आणि ओळखीचे लोक एमजी हॉस्पिटलमध्ये पोहोचले, त्यानंतर हॉस्पिटलमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली. भीमगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी सुरजित सिंग आदींनी रुग्णालयातील सुरक्षेची जबाबदारी घेतली. भाजपचे जिल्हाध्यक्ष लाडू लाल तेली आणि हिंदू संघटनांशी संबंधित अधिकाऱ्यांनीही एमजी हॉस्पिटल गाठून संताप व्यक्त केला आणि बेमुदत भिलवाडा बंदची हाक दिली. जोपर्यंत मृतांच्या नातेवाईकांना ५० लाखांची नुकसान भरपाई दिली जात नाही आणि दोषींना अटक होत नाही. तो पर्यंत भिलवाडा बंदची हाक देण्यात आली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आणि प्रशासन दोघेही सतर्क झाले. त्याचवेळी, कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये, म्हणून भिलवाडा शहरी भागात आज सकाळपासूनच ६ ते उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com