Accident News: रंगरंगोटीचे काम करून जेवणाला बसले अन्...; भरधाव कारनं २० मजुरांना चिरडलं, २ जणांचा मृत्यू

Jabalpur Horrific Accident: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये असलेल्या बरेला महामार्गावर भीषण अपघात झाला. भरघाव कारने रस्त्याच्या कडेला जेवण करणाऱ्या कामगारांना चिरडले. यात १३ जण जखमी झाले असून २ जणांचा मृत्यू झालाय.
Jabalpur Horrific Accident:
Injured labourers being shifted to hospital after a speeding car hit them on Barela Highway in Jabalpur.saam tv
Published On
Summary
  • जबलपूरच्या बरेला हायवे रोडवर भीषण अपघात

  • भरधाव क्रेटा कारने जेवण करणाऱ्या २० मजुरांना चिरडलं

  • अपघातानंतर मोठी धावपळ, जखमींना रुग्णालयात दाखल

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एक भीषण अपघात झालाय. एका भरधाव कारनं जेवण करणाऱ्या २० मजुरांना चिरडलं. नियंत्रण सुटल्यानंतर भरधाव कारनं रस्त्याच्या बाजुला जेवण करणाऱ्यांना चिरडलं. या दुर्घटनेमुळे मोठी धावपळ उडाली. दुर्घटना घडल्यानंतर त्या मार्गावरून जाणाऱ्या इतर लोकांनी आणि पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितलं जात आहे.

Jabalpur Horrific Accident:
Pune Tempo Accident: पुण्यात अपघाताचा थरार! अनियंत्रित टेम्पोची फुटपाथवरील अनेक वाहनांना धडक

जबलपूरच्या बरेला हायवे रोडवर हा भीषण अपघात झाला.भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा कारने मजुरांना उडवलं. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील ग्रीलला रंगरंगोटीचे काम चालू होते. दुपारच्या वेळी मजूर जेवण करायला रस्त्याच्या कडेला बसले होते. त्यावेळी भरधाव कारनं त्यांना चिरडलं.अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या जखमींमध्ये ५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

Jabalpur Horrific Accident:
Solapur Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर कारचा भंयकर अपघात, ५ जणांचा जागीच मृत्यू

बरेलातील एकता चौकात रस्त्याच्या दुभाजकाची साफसफाई आणि रंगकाम सुरू होते. या कामात दोन डझनहून अधिक कामगार हे काम करत होते. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सर्व कामगार जेवण करायला बसले होते. तेव्हा एका भरधाव पांढऱ्या कारने त्यांना चिरडलं. या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनएचआयचे कामगार महामार्गावर काम करत होते. त्यांना एका पांढऱ्या कारने धडक दिली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर १३ कामगार जखमी झालेत. यांची ओळख पटली आहे. ४० वर्षीय लच्छू बाई आणि चेन वती असे मृत झालेल्या महिलांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com