
इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये १५ महिन्यांहून अधिक काळापासून सुरू असलेले युद्ध थांबले आहे. अमेरिका, कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थींमुळे युद्धविराम झाले आहे. मात्र इस्रायलकडून अजूनही हल्ले थांबले नाहीत. नियोजित युद्धविराम झाल्यानंतर गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात १० पॅलेस्टिनी ठार झाले. जोपर्यंत हमास युद्धबंदीच्या अटींनुसार बंधकांची सुटका करत नाही तोपर्यंत इस्रायल हल्ले थांबवणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
रविवारी जाहीर करण्यात आलेल्या एका निवेदनानुसार, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायली हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झालाय. उत्तर गाझामध्ये तीन आणि रफाहमध्ये एक जण ठार झाला, तर २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. हमास जोपर्यंत अटक केलेल्यांची नावे जाहीर करत नाही तोपर्यंत युद्धविराम होणार नाही, असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलंय. त्यानंतर इस्रायलकडून हा हल्ला करण्यात आलाय.
पॅलेस्टिनी गटांनी नावांच्या विलंबासाठी "तांत्रिक" कारणे जबाबदार धरली आहेत. हमासने गाझामधील युद्धविराम कराराच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी मुक्त झालेल्या तीन इस्रायली बंदिवानांची नावे जाहीर केली, असे हमासच्या प्रवक्त्याने टेलिग्रामवरील पोस्टमध्ये सांगितले.
हमासने गाझामधील युद्धविराम कराराच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी मुक्त झालेल्या तीन इस्रायली बंदिवानांची नावे जाहीर केली, असे हमासच्या प्रवक्त्याने टेलिग्रामवरील पोस्टमध्ये सांगितलं. युद्धबंदीला सुरुवातीला एक तास उशीर झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. हमासच्या सशस्त्र शाखा, कासम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू ओबैदा म्हणाले, "कैदी अदलाबदल कराराचा एक भाग म्हणून, आम्ही आज तीन महिला ओलिसांना सोडण्याचा निर्णय घेतलाय.
रोमी गोनेन, 24, एमिली डमरी, 28 आणि डोरोन शतानबर खैर (31) अशी सुटका झालेल्यांची नावे आहेत. इस्रायलचे दक्षिणपंथी राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन-गवीर आणि त्यांच्या राष्ट्रवादी-धार्मिक पक्षाचे इतर दोन मंत्र्यांनी युद्धविराम करारावरून नेतान्याहू यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिलाय. इस्रायलमधील ज्यू पॉवर पक्षाचे नेते ओत्झमा येहुदित म्हणाले ते आता सत्ताधारी आघाडीचा भाग नाहीत. हा सरकार पाडण्याचा प्रयत्न नाही, तर आमचा युद्धबंदीला विरोध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.