Israel Hamas War : युद्धादरम्यान इस्राइलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोन; काय झाली चर्चा?

Israel VS Hamas War : इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला.
PM Netanyahu call To PM Modi
PM Netanyahu call To PM Modisaam Tv
Published On: 

Israel PM Netanyahu Called PM Modi :

इस्राइल आणि हमास यांच्यात चार दिवसापासून युद्ध चालू आहे. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे सुमारे १६०० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर ७ हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान मध्य पूर्वेतील अनेक मुस्लीम राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवलाय. तर अमेरिका आणि युरोपातील काही देश इस्रायलबरोबर उभे आहेत. भारतानेही इस्राइलच्या बाजूने भूमिका घेतली आहे. याच दरम्यान इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. (Latest News)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स (आधीचे ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी मला फोन करून तिथल्या परिस्थितीची माहिती दिली. याबाबत मी त्यांचे आभार मानतो. या बिकट परिस्थितीत आम्ही भारतीय लोक इस्राइलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत. भारत अशा दहशतवादी कृत्यांचा तीव्र आणि निषेध करतो. अशी पोस्ट मोदींनी केलीय.

दरम्यान, भारत आणि इस्राइल यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर ही मैत्रित भर पाडली आहे. इस्राइलने पंतप्रधान मोदी यांच्या समर्थनासाठी आभार मानले आहेत. हमास दहशतवादी संघटनेने इस्राइलवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात आधी पुढे येत याचा निषेध केला होता.

भारत हा प्रभावशाली देश : इस्राइलचे राजदूत

भारतातील इस्राइलचे राजदूत नाओर गिलॉन म्हणाले होते की, आम्हाला भारताच्या भक्कम पाठिंब्याची गरज आहे. भारत हा एक प्रभावशाली देश आहे असून तो दहशतवादाचे आव्हान समजून घेतो. भारताला या संकटाचीही चांगली जाणीव आहे. यावेळी हे अत्यंत महत्वाचे आहे की, आम्हाला सर्व काही करण्याची क्षमता दिली गेली आहे, जेणेकरून हमासचे अत्याचार चालू ठेवू शकणार नाही.

दरम्यान हमासने १५० पेक्षा जास्त इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवल्याचे वृत्त येत आहे. इस्राइलच्या प्रतिहल्ल्यानंतर हमासची पिछेहाट झालीय. गाझा पट्टीचा काही भाग इस्राइलच्या सैन्याने आपल्या ताब्यात घेतला आहे.

PM Netanyahu call To PM Modi
Israel and Palestine: कोण आहे हमासचा प्रमुख; का अन् कधी केली हमासची स्थापना? काय होता वाद?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com