ओलीस ठेवलेल्या इस्राइली नागरिकांची सुटका केल्याशिवाय युद्धविराम होऊ शकत नाही. यु्द्ध थांबलंच तरी युद्धानंतर अनिश्चित काळासाठी गाझावर इस्राइलचा ताबा राहिल, अशी भूमिका इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी घेतल्यामुळे आखाती देशात युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत खुलासा केला. गाझात मदतकार्य सुरू करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.
गाझापट्टीवर कब्जा करणे ही इस्राइलसाठी मोठी चूक असेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला होता. त्यावर नेत्यानाहू म्हणाले, हमास एक दहशतवादी संघटना असून हमासने ७ ऑक्टोबरला इस्राइलवर केलेला हल्ला संपूर्ण जगाने पाहिला. त्यामुळे गाझाच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी इस्राइलची असेल आणि असं झालं नाही तर हमास कोणत्या थराला पोहोचेल हे सांगणे कठीण आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सध्याच्या परिस्थितीत युद्धविरामाची घोषणा केली तर ज्याच्यासाठी यद्ध सुरू होते तो उद्देश पूर्ण होऊ शकणार नाही. ओलीस ठेवलेल्या २४० नागरिकांची हमास सुटका करणार नाही. या युद्धात इस्राइलला खूप त्रास सरन करावा लागला आहे. इस्राइलचे अनेक नागरिक मारले गेले आहेत. अनेक जवान शहिद झालेत. त्यामुळे हमास सोबतचे युद्ध सुरूच राहणार आहे आणि हे युद्ध जिंकण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान इस्राइलचे संरक्षण मंत्री योव गॅलांट यांनी लष्कराच्या मुख्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सैन्याला हमासच्या दहशतवाद्यांचे बोगदे नष्ट करण्याच्या सूचना केल्या. आता हमासच्या दहशतवाद्यांकडे दोनच पर्याय असतील. एकतर बोगद्यांमध्येच मरण पत्करावं किंवा इस्राइलच्या सैन्यासमोर बिनशर्त शरण यावे. त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसेल असा इशारा गॅलांट यांनी दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.