Israel Air Strike : इस्रायलचा पॅलेस्टाईनवर पुन्हा एअर स्ट्राईक, गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत 4,651 लोकांचा मृत्यू

Israel Air Strike On Palestine: इस्रायलचा पॅलेस्टाईनवर पुन्हा एअर स्ट्राईक, गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत 4,651 लोकांचा मृत्यू
Israel Air Strike On Palestine
Israel Air Strike On PalestineSaam Tv
Published On

Israel Air Strike On Palestine: 

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध आता अधिक भीषण होताना दिसत आहे. इस्रायली सैन्याने गाझामधील पॅलेस्टिनींवर पुन्हा एअर स्ट्राईक केला असल्याची बातमी समोर येत आहे. एपीच्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराने सोमवारी (23 ऑक्टोबर) हा एअर स्ट्राईक केला. याआधी इस्रायलने उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांना येथून स्थलांतरित होण्याचा इशारा दिला होता.

इस्रायलने नुकत्याच दिलेल्या इशाऱ्यात उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांना दक्षिणेकडे जावे, असे म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की, जर उत्तर गाझामध्ये राहणारे लोक दक्षिणेकडे गेले नाहीत, तर ते दहशतवादी संघटनांचे सहयोगी मानले जाऊ शकतात. आता इस्रायलने पॅलेस्टिनींवर एअर स्ट्राईक सुरू केले आहेत.   ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Israel Air Strike On Palestine
Bangalore Viral Video : 50 सेकंद आणि 14 लाखांची चोरी, BMW ची काच फोडून पैसे केले लंपास, पाहा CCTV फुटेज

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी हमासच्या दहशतवाद्यांशी लढण्यासाठी गाझा पट्टीमध्ये निवडक ठिकाणी हल्ले केले. इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हमास एकत्र येत असलेल्या ठिकाणांना नष्ट करण्याचा त्यांचा उद्दिष्ट असल्याचे सैन्याने म्हटले आहे.

गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत 4,651 लोकांचा मृत्यू

पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की, या भागात आतापर्यंत किमान 4,651 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 14,254 जखमी झाले. 7 ऑक्टोबरपासून वेस्ट बँकमध्ये हिंसाचार आणि इस्रायली हल्ल्यांमध्ये 96 पॅलेस्टिनी ठार आणि 1,650 जखमी झाले आहेत.  (Latest Marathi News)

Israel Air Strike On Palestine
Mumbai Local News: धावती लोकल पकडताना 2 महिलांचा तोल गेला, पण होमगार्डच्या रुपाने देवदूतच धावून आला, नेमकं काय घडलं?

तसेच इस्रायलमध्ये 1,400 हून अधिक लोक मारले गेले आहेत, त्यापैकी बहुतेक नागरिक आहेत. जे दक्षिण इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात ठार झाले होते. यासोबतच हमासने 222 लोकांना ताब्यात घेतल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com