Bangalore Viral Video : 50 सेकंद आणि 14 लाखांची चोरी, BMW ची काच फोडून पैसे केले लंपास, पाहा CCTV फुटेज

Bangalore Crime News: 50 सेकंद आणि 14 लाखांची चोरी, BMW ची काच फोडून पैसे केले लंपास, पाहा CCTV फुटेज
Bangalore Crime News
Bangalore Crime NewsSaam Tv
Published On

Bangalore Crime News :

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये दिवसाढवळ्या मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. येथे पार्क केलेल्या बीएमडब्ल्यू कारमधून सुमारे 14 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली. ही चोरीची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण दुचाकीवर आले आणि कारजवळ दुचाकी थांबवल्याचे दिसत आहे. यानंतर एका तरुणाने कारची काच फोडून आत प्रवेश केला आणि पैशांची बॅग घेऊन पळ काढला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bangalore Crime News
Rajinikanth Viral Video: सेम टू सेम रजनीकांत! पायात स्लिपर आणि हाफ पँट घातलेल्या 'थलाइवर'ला पाहून चाहते चकीत, VIDEO व्हायरल

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, सीसीटीव्ही फूटजमध्ये दिसत आहे की, BMW X5 कारजवळ दोन जण तोंडावर रुमाल बांधून आल्याचं दिसत आहे. या कारची किंमत एक कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांपैकी एक बाईकवर आहे आणि दुसरा अवतीभवती पाहत असल्याचं दिसत आहे. यानंतर यातील दुसरा व्यक्ती कारची काच फोडतो आणि त्या आत शिरीतो. (Latest Marathi News)

याचदरम्यान, त्याचा साथीदार बाईक सुरु ठेवून त्याची वाट पाहताना दिसतो. यानंतर हातात एक पॅकेट घेऊन तो माणूस लवकरच बाहेर येतो. तो दुचाकीवर बसतो आणि दोघेही घटनास्थळावरून पळून जातात. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Bangalore Crime News
Mumbai Local News: धावती लोकल पकडताना 2 महिलांचा तोल गेला, पण होमगार्डच्या रुपाने देवदूतच धावून आला, नेमकं काय घडलं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएमडब्ल्यू कार बेंगळुरूच्या अणेकल तालुक्यातील रहिवासी मोहन बाबू यांची असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना शुक्रवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com