Israel Hamas War : इस्त्रायलने २४ तासांतच घेतला बदला, हमासवर रॉकेट हल्ला; ३५ पॅलेस्टिनी ठार झाल्याचा दावा

Israel attacks Hamas : शनिवारी हमासने इस्त्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने सोमवारी पहाटे हमासवर हवाई हल्ला केला.
Saam TV
Israel Hamas WarANI
Published On

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा जीव गेला आहे. शनिवारी हमासने इस्त्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायलने सोमवारी पहाटे हमासवर हवाई हल्ला केला.

Saam TV
Cyclone Remal : रेमल चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकलं; बंगालमध्ये जोरदार वारा अन् तुफान पाऊस, पाहा VIDEO

इस्त्रायलने केलेल्या या हवाई हल्ल्यात ३५ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाल्याचा दावा हमासने केला आहे. गाझा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रफाहमधील विस्थापित लोकांसाठी छावणी उभारण्यात आली होती. याच छावणीवर इस्त्रायने हवाई हल्ला केला.

यात ३५ निष्पाप लोक मारले गेले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. याशिवाय इस्त्रायलने उत्तर गाझामधील जबलिया अल-नजलाह भागातील एका घरावरही हल्ला केल्याचं हमासने म्हटलं आहे. यात १२ लोक ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

दुसरीकडे, इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की, त्यांनी मध्य इस्रायलमधील दक्षिण गाझामधील रफाह भागातून ८ रॉकेट डागले. दरम्यान, मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी मजबूत पॅलेस्टिनी प्राधिकरणाची गरज आहे, असं युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांनी म्हटलं आहे.

याआधी हमासने रविवारी (२६ मे २०२४) इस्रायलवर मोठा हल्ला केला होता. हमासची सशस्त्र शाखा अल-कासम ब्रिगेडने रविवारी तेल अवीववर क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी हमासच्या सशस्त्र शाखा अल-कसाम ब्रिगेडने इस्त्रायलवर क्षेपणास्त्र डागले. मात्र, या हल्ल्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Saam TV
Papua New Guinea Landslide: पापुआ न्यू गिनीआमध्ये मृत्यूतांडव! संपूर्ण गाव उद्ध्वस्त..., भूस्खलनामुळे 670 जण ढिगाऱ्याखाली जिवंत गाडले गेले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com