
इस्रायल-इराणमधील संघर्षात मोठी जीवितहानी होत आहे. या दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिकेनेही उडी घेतली अमेरिकेकडून इराणवर मोठे हवाई हल्ले केले. इराणमधील ३ अणुकेंद्र नष्ट केल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने संताप व्यक्त करत थेट अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला केला. त्यानंतर आता इस्रायलने इराणच्या एविन तुरुंगावर हल्ला केला.
इस्रायलने आज पुन्हा इराणवर मोठे हल्ले केले आहेत. इस्रायलने इराणच्या एविन तुरुंगासह आणखी काही ठिकाणी भीषण हल्ले केलेत. या हल्ल्यात अनेक परिसरही उद्ध्वस्त झालेत. या हल्ल्याच्या विध्वंसाचे व्हिडीओ समोर आलेत. या संदर्भातील वृत्त इराणी सरकारी टीव्हीने दिलेल्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलंय.
तेहरानजवळ सोमवारी दुपारी तीव्र इस्रायली हवाई हल्ला झाल्याची माहिती समोर आलीय. यावेळी इस्रायलने इराणच्या एविन तुरुंगाच्या गेटवर भीषण हल्ला केलाय. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र आजच्या या हल्ल्यात काही जीवितहानी झाली का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एविन तुरुंग हे पाश्चात्य कैद्यांना ठेवण्यासाठी ओळखलं जाणारं कुप्रसिद्ध तुरुंग आहे.
इस्रायलने केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालेत. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. इस्रायली हल्ले तेहरानमधील इराणी सरकारी ठिकाणांना लक्ष्य केल्याचं इस्रायलने म्हटलंय.
उत्तर इस्रायलमध्येही इराणकडून अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये इस्रायलमधील एश्दोद शहरावर झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्याचे क्षण कैद झालेत. हे एक डॅशकॅम फुटेज आहे. यात एका गाडीजवळ क्षेपणास्त्र स्फोट झाल्याचं दिसत आहे. स्फोटानंतर दगड आणि ढिगारे आकाशात कसे उडतात हे स्पष्ट दिसते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.