अमेरिकेचे युद्धखोर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात गरळ ओकली... भारत आणि चीन या नरकासारख्या देशातून लोकं अमेरिकेत येऊन मुलं जन्माला घालतात, असं म्हणत भारताचा अपमान केला... मात्र यानंतर भारतासाठी चक्कं इराणनं ट्रम्प यांच्यासोबत पंगा घेतलाय... इराणी दुतावासानं एक व्हिडीओ शेअर करत कधीतरी भारतात येऊन पाहा... आणि मग बोला, अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांची झिंग उतरवलीय..
खरं तर मुंबईतील इराणी दुतावासानं आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय.. त्यात महाराष्ट्रातील निसर्गसौंदर्य आणि प्रगतीचं दर्शन घडवलंय... या व्हिडीओत मुंबईतील टोलेजंग इमारती, महामार्ग, पुलांचं जाळं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनाही प्रत्यक्ष येऊन पाहावं वाटेल, असा गणेशोत्सव दाखवलाय... मनमोहक धबधबे, हिरवेगार डोंगर, निसर्गसौंदर्य दाखवण्यात आलंय...
विशेष म्हणजे ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख करुन भारताचा अपमान केल्यानंतरही भारताच्या परराष्ट्र मंत्रालय मूग गिळून गप्प बसलं... मात्र इराण भारतासाठी घावून आलाय... भारत कितीही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या मैत्रीचे गोडवे गात असला तरी ट्रम्प हे विंचवासारखा डंख मारतातच... मात्र इराण आणि भारतामध्ये हजारो वर्षांच्या मैत्रीचे दाखले मिळतात...
इराण हा भारतासाठी कच्चा तेलाचा महत्वाचा पुरवठादार राहिला आहे... इराण भारतीय कृषीमालाचा महत्वाचा आयातदार आहे...एवढंच नाही तर पाकिस्तानला बायपास करुन थेट मध्य आशियाई देशांशी व्यापार करण्यासाठी इराणने चाबहार बंदर विकासाचा भारतासोबत करार केलाय.. तर इराणने भारताच्या नेतृत्वात अलिप्ततावादी धोरणाचा पुरस्कार केला... याबरोबरच हजारो वर्षांपासून भारत आणि इराण भाषा, संस्कृती आणि व्यापारी भागिदार राहिला आहे..
अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर भारतानंही आपली मैत्री निभावत मेडिकल साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली होती... मात्र त्यानंतर आयआरजीसीनं भारतीय जहाजांवर हल्ला केल्याचं समोर आलं... एवढंच नाही तर 1 भारताकडे येणारं व्यापारी जहाज जप्त केलं... यानंतर इराण आणि भारत संबंध बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.. मात्र आता इराण भारताच्या मदतीला धावून आल्यानं ही मैत्री आणखी दृढ होण्याचीच शक्यता आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.