इराण इस्त्रायल-अमेरिकेसमोर शरण जाण्यास तयार नसला तरी शत्रूला जबर नुकसान पोहोचवतोय. खासकरून बलाढ्य अमेरिकेची अत्यानुधिक संरक्षण प्रणाली या युद्धात फेल गेली आहेत. त्यातच आता अमेरिकेचं आणखी एक लढाऊ विमानं पाडल्याचा दावा इराणनं केलाय. इराणच्या या दाव्यानं पेंटागॉनसह इस्त्रायलचीही झोप उडवलीये. इराणनं दावा केलेलं अमेरिकेचं F-35 जगातील शक्तीशाली मानल्या जाणाऱ्या लढाऊ विमानांपैकी एक आहे. अमेरिकेच्या या F-35 लढाऊ विमान इतकं खास का आहे पाहूयात
एफ-35 लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये
सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एफ-35 चे स्टेल्थ तंत्रज्ञान
हे लढाऊ विमान एकाच वेळी हवेत हल्ला आणि जमिनीवर बॉम्बफेकसह टेहळणी करू शकतं
याचा वेग अंदाजे 1931 किमी प्रति तास असून ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे.
यात प्रगत सेन्सर प्रणाली आणि रडार असून पायलटला 360 अंशांच्या कोनात पाहता येतं
जगातील सर्वात महागडं आणि रडारला सहज चकवणारे लढाऊ विमान F-35 ला झालेल्या गंभीर नुकसानीच्या वृत्ताने अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रात खळबळ उडालीये. स्थानिक वेळेनुसार पहाटेच्या सुमारास मध्य इराणी हवाई क्षेत्रात संरक्षण प्रणालीद्वारे F-35 पाडण्यात आल्याचं IRGC नं म्हटलंय. दरम्यान, इराणनं F-35 लढाऊ विमानाला कसं लक्ष्य केलंय ?
अमेरिकेचं F-35 विमान पाडण्यासाठी इराणनं बावर-373 हवाई संरक्षण प्रणालीचा वापर केलाय.रडार सिग्नल न पाठवता विमानांचा शोध घेऊ शकणाऱ्या पॅसिव्ह सेन्सर तंत्रज्ञानाचा यात वापर झाल्याची शक्यता आहे. इराणने या हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला असून, त्यात विमानाला मिसाईल हिट करत असल्याचा दावा करण्यात आलाय. खरं तर, याआधी इराणच्या 64 लाखांच्या ड्रोननं अमेरिकेचं 700 कोटींचं KC-135 रिफ्युलिंग विमान पाडलं होतं. त्यानंतर आता F-35 फायटर जेटला इमर्जन्सी लँडिंग करावी लागलीय, हे अमेरिकी सेंट्रल कमांडनेही मान्य केलय. विशेष म्हणजे, सध्या अमेरिकेकडून या 'अदृश्य' विमानाचं मोठ्या प्रमाणात मार्केटिंग सुरु आहे. अशावेळी F-35 बाबत इराण जो दावा करतय तसं खरच घडलं असेल तर अमेरिकेसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे, एव्हढं नक्की...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.