IPS Officer Transfer: १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, पोलिस दलात खळबळ; कुणाची कुठे नियुक्ती?

Haryana Police Officer Transfer: हरियाणा सरकारने शनिवारी रात्री उशिरा मोठा प्रशासकीय फेरबदल केला. १३ आयपीएस आणि २२ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
IPS Officer Transfer: १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, पोलिस दलात खळबळ; कुणाची कुठे नियुक्ती?
IPS Officer TransferSaam Tv
Published On: 
  • हरियाणा पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल

  • हरियाणा सरकारकडून १३ आयपीएस आणि २२ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या

  • वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर हरियाणा पोलिस दलात खळबळ उडाली

  • ३५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने दिले

हरियाणा पोलिस दलामध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. हरियाणा सरकारने शनिवारी रात्री उशिरा १३ आयपीएस अधिकाऱ्यांसह ३५ पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये १३ वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि २२ पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याचसोबत त्यांची राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

हरियाणा सरकारने काढलेल्या बदल्यांच्या आदेशानुसार, आयपीएस अधिकारी नवदीप सिंग विर्क यांची हरियाणा मानवाधिकार आयोगाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवदीप सिंग विर्क हे याआधी हरियाणा राज्य अंमलबारी ब्युरोचे महासंचालक आणि दक्षता व सुरक्षा विभागाचे संचालक म्हणून काम करत होते. आता त्यांच्या जागी माता रवी किरण यांची हरियाणा राज्य अंमलबारी ब्युरोच्या अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, त्यांच्याकडे दक्षता आणि सुरक्षा संचालकपदाची देखील जबाबदारी देण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी बी. सतीश बालन यांची रेल्वे आणि कमांडो पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी विशेष कृती दलाचे प्रमुख म्हणून काम केले. मनीष चौधरी यांची पंचकुला येथील राज्य दक्षता आणि भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देखील देण्यात आला आहे. कारागृह विभागाच्या पोलिस महानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभारही चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

IPS Officer Transfer: १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, पोलिस दलात खळबळ; कुणाची कुठे नियुक्ती?
पोलीस दलात पुन्हा मोठा फेरबदल; 5 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती?

सुमित कुमार यांची मानेसर येथील चौथ्या आयआरबी बटालियनच्या अतिरिक्त कमांडंटपदी नियुक्ती करण्यात आली असून ते त्यांच्या सध्याच्या कर्तव्यांव्यतिरिक्त ही जबाबदारी सांभाळणार आहेत. तर, विक्रांत भूषण यांची सोनीपत येथील गोहाना येथे पोलीस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. जितेंद्र गेहलावत यांची सोनीपत येथील गुन्हे शाखेत पोलिस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली . हितेश यादव यांची गुरुग्राम येथे वाहतूक पोलिस उपआयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IPS Officer Transfer: १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, पोलिस दलात खळबळ; कुणाची कुठे नियुक्ती?
IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! २० आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

सिमरदीप सिंग यांची भोंडसी येथील विशेष कृती दलाचे पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे झज्जरचे पोलिस आयुक्त आणि भोंडसी येथील इंडिया रिझर्व्ह बटालियनचे पोलिस महानिरीक्षक या पदांचा देखील अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. हमीद अख्तर यांची पदोन्नतीनंतर रोहतक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. धीरज कुमार यांची पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे हरियाणा लोकायुक्त, पोलिस अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील असणार आहे.

IPS Officer Transfer: १३ आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, पोलिस दलात खळबळ; कुणाची कुठे नियुक्ती?
IPS Transfer : प्रशासनात मोठा बदल! ५ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com