Earthquake : पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के; ५.२ तीव्रतेच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; इंडोनेशिया हादरलं

Indonesia Earthquake Update News : इंडोनेशियात रविवारी पहाटे 5.2 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. 10 किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू असल्याची माहिती.
Indonesia Earthquake News
Indonesia Earthquake News AI Image
Published On: 
Summary
  • इंडोनेशियात रविवारी पहाटे 5.2 तीव्रतेचा भूकंप जाणवला

  • सकाळी 5:07 वाजता नागरिकांना भूकंपाचे हादरे जाणवले

  • भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता

  • भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी नाही

इंडोनेशिया रविवारी भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरल्याची बातमी समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास अचानक जाणवलेल्या या भूकंपामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी नोंदवण्यात आली आहे.

इंडोनेशिया हा जगातील भूकंपप्रवण देशांपैकी एक मानला जातो. हा देश पॅसिफिक रिंग ऑफ फायर या भूकंपीय पट्ट्यात येत असल्याने येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. या परिसरात अनेक टेक्टॉनिक प्लेट्सची हालचाल होत असल्यामुळे भूकंप आणि ज्वालामुखीच्या घटना तुलनेने अधिक घडतात.

Indonesia Earthquake News
Earthquake : सकाळीच हिंगोलीत प्रचंड खळबळ! भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरली; रिश्टर स्केलवरील नोंद पाहून सगळेच हादरले

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या वेळी बहुतांश नागरिक आपल्या घरांमध्ये असतानाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेकांची झोप उडाली. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घरातील वस्तू हलू लागल्याने तसेच अचानक जमिनीला हादरे बसल्याने नागरिक घाबरले. अनेकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर धाव घेतली. काही वेळातच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली.

Indonesia Earthquake News
Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

दरम्यान, रविवारी जाणवलेल्या या भूकंपामुळे कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, पहाटेच्या वेळी आलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपानंतर स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com