Expensive Number Plate
Expensive Number PlateSaam Tv

Expensive Number Plate: देशातील सर्वात महागडी नंबरप्लेट; किंमत २.०८ कोटी; कोणी केली खरेदी?

India's Most Expensive Number Plate: देशातील सर्वाधिक महाग नंबरप्लेट खरेदी करण्याचा रेकॉर्ड नोंदवला आहे. एका व्यक्तीने चक्क २.०८ कोटींची नंबरप्लेट खरेदी केली आहे.
Published on
Summary

देशातील सर्वात महागडी नंबरप्लेट

आंध्र प्रदेशातील व्यक्तीने खरेदी केली २ कोटींची नंबरप्लेट

नोंदवला नवीन रेकॉर्ड

प्रत्येकाला काही न काही गोष्टींचा छंद असतो. काहींना वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा, खाण्याचा, गाड्यांचा, घड्याळे घेण्याचा शौक असतो. दरम्यान, आता एका एका व्यक्तीने चक्क कोट्यवधि रुपयांची नंबरप्लेट घेतली आहे. आंध्र प्रदेशातील एका वाहनधारकाने आपल्या कारला सर्वात महागडी नंबरप्लेट बसवून घेतली आहे. या व्यक्तीच्या कारच्या नंबरप्लेटची किंमत २ कोटी रुपये आहे.

Expensive Number Plate
Post Office Scheme: पोस्टाची सुपरहीट योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून महिन्याला ₹५५०० मिळवा

लक्झरी नंबरप्लेटची अनोखी गोष्ट

अनेकजण कोट्यवधी रुपयांची कार घेतात. लक्झरी कार घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, या पठ्ठ्याने चक्क २.८ कोटी रुपयांनी कारची नंबरप्लेट घेतली आहे. या कारचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कारचा नंबर DDC 001 आहे. ही देशातील सर्वात महाग नंबरप्लेट आहे.

२ कोटींची नंबरप्लेट (Number Plate Worth 2 Crore)

लक्झरी युज्ड कारचे लोकप्रिय शोरुम Big Boy Toyz (BBT) ने नवीन वेंचर ऑक्शन हाउस सुरु केले आहे. हे भारतातील असे प्लॅटफॉर्म आहे जिथे महागडे आणि लक्झरी गोष्टींचा लिलाव होतो. यावेळी या इव्हेंटमध्ये एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. या लिलावात DDC 001 नंबरप्लेट २ कोटी रुपयांना विकली गेली आहे.

Expensive Number Plate
Post Office Scheme : एक लाख गुंतवा अन् व्याजातून ₹४४,९९५ मिळवा; पोस्टाच्या भन्नाट योजनेचं कॅल्क्युलेशन वाचा

भारतातील सर्वात महागडी DDC 001 नंबरप्लेट (DDC 001 the most expensive number plate in india)

आंध्र प्रदेशमधील गुंटूर येथील किरण कोलापाकुला यांनी या कारसाठी बोली लावली होती. भारताच्या इतिहासातील ही सर्वाधिक महागडी नंबरप्लेट आहे. या नंबप्लेटचे आधी मालक जतिन अहुजा होते. याआधी KL 07 DG 0007 ही नंबरप्लेट ४६ लाख रुपयांची प्लेट खरेदी केली होती.

Expensive Number Plate
Pension Hike: महत्त्वाची बातमी! EPFO कर्मचार्‍यांची पेन्शन ₹६५००नी वाढणार? सरकारने एका झटक्यात विषय संपवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com